‘चूक भूल माफ करा’, म्हणत गाणं गाताना दिसली ‘स्वीटू’; सुमधूर व्हिडिओला नेटकऱ्यांची पसंती


इतर काही मालिकांप्रमाणे, ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ही मालिका रसिकांच्या पसंतीस उतरत आहे. या मालिकेतील ‘ओम’ अन् ‘स्वीटू’ची लव्हस्टोरी प्रेक्षकांना खूप आवडते. त्यातील स्वीटू अर्थातच अभिनेत्री अन्विता फलटणकर या मालिकेद्वारे दररोज प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. याशिवाय अभिनेत्री सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते. तिचे फोटो व व्हिडिओ चाहत्यांकडून खूप पसंतही केले जातात.

विशेष म्हणजे अन्विता आता गाणं गाताना दिसली आहे. होय, नुकत्याच समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये अभिनेत्री चक्क गाणं गात आहे. हा व्हिडिओ स्वतः अन्विताने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ती अरिजित सिंगने गायलेलं ‘आबाद बरबाद’ हे गाणं अतिशय सुरात गात आहे.

हा व्हिडिओ शेअर करत अन्विताने कॅप्शनमध्ये लिहिलंय, “चूक भूल माफ.” सोबतच तिने ‘धाडस’ हे हॅशटॅगही दिलं आहे. स्वीटूचा हा सुरीला अंदाज अनेकांच्या पसंतीस पडला आहे. या व्हिडिओवर आता चाहत्यांनी भरभरून प्रेम व्यक्त केले आहे. कमेंट्सच्या माध्यमातून चाहते तिचे कौतुक करताना दिसत आहेत. (yeu kashi tashi mi nandayla fame sweetu singing aabad barbaad song)

अन्विताच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर तिने नाटकांपासून ते बऱ्याच चित्रपटामध्ये अभिनय करून, रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. तिने रवी जाधव दिग्दर्शिक ‘टाईमपास’मध्ये अभिनेत्री केतकी माटेगावकरच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती. यानंतर ‘गर्ल्स’ या चित्रपटात ती ‘रुमी’च्या भूमिकेत पाहायला मिळाली होती. याशिवाय अन्विताने ‘चतुर चौकडी’ आणि ‘रुंजी’ या मालिकेतही काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कपिल शर्माच्या शोमध्ये भोजपुरीच्या सुूपरस्टार्सची धमाल; तर कपिल शर्माचीही बोलती झाली बंद

-‘ही’ गोष्ट अधिक प्रिय असल्यामुळे, बॉलिवुड पार्ट्यांमध्ये जाणे टाळतो अक्षय कुमार; अभिनेत्याने स्वत: केला होता खुलासा

-मीडियम शॉर्ट हेअरमध्ये बरीच सुंदर दिसतेय ऋता; नवीन हेअरकट फ्लाँट करताना दिसली अभिनेत्री


Leave A Reply

Your email address will not be published.