केआरके म्हणजेच अभिनेता कमाल राशिद खान हा मागील काही दिवसांपासून खूपच चर्चेत आहे. तो नेहमीच त्याच्या यूट्यूब चॅनेलवर बॉलिवूड चित्रपटाबाबत रिव्ह्यू देत असतो. त्याच्या या व्हिडिओमध्ये तो अनेकवेळा आक्षेपार्ह भाषेचा वापर करतो. काही दिवसांपूर्वी त्याने सलमान खानच्या ‘राधे’ या चित्रपटाबाबत नकारात्मक रिव्ह्यू दिला होता. यानंतर सलमान खानने केआरकेवर मानहानीचा गुन्हा देखील दाखल केला होता. याबाबत कोर्टाने त्यांचा अंतिम निर्णय सांगितला होता की, या पुढे केआरके सलमान खानच्या विरोधात कोणतीच पोस्ट करणार नाही. (KRK deleted all the videos against Salman Khan, say sorry for hurting him)
कोर्टाकडून आलेल्या या सुनावणीनंतर केआरकेने सोशल मीडियावर त्याची बाजू मांडत सलमान खानची माफी मागितली आहे. त्याने ट्वीट केले आहे की, “प्रिय सलमान खान, मी तुझ्यावर केलेले सर्व व्हिडिओ डिलीट केले आहे. माझा उद्देश तुझ्या किंवा इतर कोणाच्याही भावना दुखावण्याचा नव्हता. पण मी तुझ्या विरोधात कोर्टाची केस चालू ठेवणार आहे. मी पुढच्या चित्रपटाबाबत तेव्हाच रिव्ह्यू देणार आहे, जेव्हा मला कोर्टाकडून परवानगी मिळेल. तुझ्या भविष्यासाठी तुला खूप शुभेच्छा!!”
https://twitter.com/kamaalrkhan/status/1408348169524633602
सलमान खानची माफी मागत केआरके पुढे म्हणाला की, “माझ्याकडून चुकून कोणता व्हिडिओ डिलीट करायचा राहून गेला असेल, तर तुमच्या टीममधील कोणीही मला तशी माहिती देऊ शकता. जरी माझ्या अन्य व्हिडिओ बाबत कोणाला काही समस्या असेल, तर मी ती डिलीट करू शकतो.” केआरकेने दिशा पटानी आणि सलमान खानच्या ‘राधे’ या चित्रपटावर जो रिव्ह्यू दिला होता. त्यामुळे प्रेक्षक त्याच्यावर चांगलेच भडकले होते.
Those people, who are saying that I got scared, should know that court didn’t order me to delete videos but I have deleted videos myself because I felt bad after realising this that someone is getting hurt because of me. I am here to protect my rights without hurting anyone!
— KRK (@kamaalrkhan) June 25, 2021
केआरकेने सलमान खानची माफी मागितल्यानंतर आता सोशल मीडियावर अनेक लोक त्याला टॅग करून म्हणत आहेत की, तो सलमान खानला घाबरला आहे. यावर केआरकेने त्यांना उत्तर दिले आहे की, “जे लोक मला म्हणत आहेत ना की, मी घाबरलो आहे. त्या लोकांना हे माहिती असलं पाहिजे की, कोर्टाने मला तसे करायला सांगितले नाही, हे मी माझ्या मनाने करत आहे. कारण मला हा विचार करून खूप वाईट वाटत आहे की, माझ्यामुळे कोणाचे तरी मन खूप दुखावले आहे. मला इथे कोणाचेही मन न दुखवता माझ्या हक्काची सुरक्षा करायची आहे.”
सलमान खानचा ‘राधे’ हा चित्रपट ईदच्या दिवशी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा होत्या. पण प्रेक्षकांच्या त्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत. या चित्रपटात सलमान खानसोबत दिशा पटानी, रणदीप हुड्डा आणि जॅकी श्रॉफ देखील होते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-