केरळ हायकोर्टाकडून चित्रपट निर्माती आयशा सुल्तानाला अटकपूर्व जामीन मंजूर; भाजप नेत्याविरुद्ध केले होते वक्तव्य

Kerala High Court Grants Anticipatory Bail To Filmmaker Aisha Sultana In The Sedition Case See


अनेकदा मोठ्या किंवा छोट्या पडद्यावर काम करताना कलाकार आणि चित्रपटसृष्टीशी निगडीत व्यक्तींना आपल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे मोठ्या संकटाचा सामना करावा लागतो. असेच काहीसे लक्षदीपची चित्रपट निर्माती आयशा सुल्तानाबाबत घडले. आयशाने एका टीव्ही शोदरम्यान लक्षद्वीपच्या प्रशासकाबद्दल वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर तिच्याविरुद्ध लक्षद्वीपच्या कवरत्ती पोलीस स्टेशनमध्ये देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, आता असे वृत्त आहे की, केरळ उच्च न्यायालयाने आयशाला अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

रविवार, बुधवार आणि गुरुवार अशा तीन दिवशी आयशाची चौकशी करण्यात आली होती. यानंतर तिला सोडले होते. लक्षद्वीपच्या कवरत्ती पोलीस स्टेशनमध्ये तब्बल ३ तास चौकशी केल्यानंतर बाहेर आल्यावर आयशाने म्हटले होते की, “आता सर्वकाही संपले आहे. मला पोलिसांनी म्हटले आहे की, मी कोची जाऊ शकते. आता मी तिथे जाण्यासाठी रवाना होईल. मी कदाचित उद्या किंवा परवापर्यंत तिथे पोहोचेल.”

काय आहे प्रकरण?
खरं तर मागील काही दिवसांपूर्वी एका टीव्ही चॅनेलरच्या डिबेटदरम्यान चित्रपट निर्माती आयशा सुल्तानाने म्हटले होते की, “लक्षद्वीपमध्ये आतापर्यंत कोरोनाचे एकही प्रकरण नव्हते. मात्र, आता रोजच १०० प्रकरणं समोर येत आहेत. मी स्पष्ट म्हणू शकते की, केंद्र सरकारने ‘बायो वेपन’ म्हणून प्रशासक प्रफुल्ल पटेल यांना तैनात केले आहे. लोकशाहीवादी आणि लोकविरोधी धोरणांची अंमलबजावणी करत आहेत, ज्यामुळे कोरोनाची प्रकरणे सतत वाढत आहेत.”

आयशा सुल्तानाच्या या वक्तव्यानंतर भारतीय जनता पक्षाने यावर कडाडून टीका केली आणि तिच्याविरुद्ध राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला. ती केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीपमधील भाजप युनिटचे अध्यक्ष अब्दुल खादर यांनी तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

अब्दुल खादर यांचा आरोप आहे की, आयशाने केंद्रशासित प्रदेशात कोरोना प्रसारणाबाबत खोटी बातमी पसरवली होती. सोबतच असेही म्हटले होते की, हे आयशाचा राष्ट्रविरोधी कृत्य होते, ज्यामुळे केंद्र सरकारची ‘देशभक्ती ची प्रतिमा’ मलीन झाली. सोबतच त्यांनी याविरुद्ध कारवाईची मागणीही प्रदर्शनही केले होते.

गुजरातच्या नरेंद्र मोदी सरकारमध्ये गृहमंत्री राहिलेले प्रफुल्ल पटेल यांना ५ डिसेंबर, २०२० रोजी लक्षद्वीपची जबाबदारी देण्यात आली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम अक्षयाची ऑनस्क्रीन सासूसोबत आहे खास मैत्री; भावना व्यक्त करत म्हणाली…

-आमिर खानच्या ‘या’ चित्रपटात झळकली होती कपिल शर्माची ‘ऑनस्क्रीन’ पत्नी सुमोना चक्रवर्ती; आज आहे कोट्यवधी संपत्तीची मालकीण

-कपूर खानदानाप्रमाणेच धर्मेंद्र यांचाही होता मुलीच्या डान्स आणि चित्रपटात काम करण्याला विरोध; ‘अशाप्रकारे’ झाले तयार


Leave A Reply

Your email address will not be published.