फ्लॉप ऍक्टर ठरूनही रॉयल जीवन जगतोय अभिनेता आफताब; तर वयाच्या ३८व्या वर्षी दुसऱ्यांदा अडकला लग्नगाठीत


बॉलिवूड ही चकाकनारी मायानगरी आहे. या ग्लॅमर क्षेत्रात येणारा प्रत्येक दिवस तुम्हाला तुमचे या क्षेत्रातले भविष्य दाखवत असतो. या बेभरवशी दुनियेत तुमचा टिकाव किती लागेल हे तर देवही सांगू शकत नाही. या क्षेत्रात असे अनेक कलाकार आहेत, जे दिसायलाही चांगले आहेत आणि अभिनय देखील चांगला करतात. मात्र त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. तरीही त्यांची लोकप्रियता तुफान आहे. यातलेच एक नाव म्हणजे अभिनेता आफताब शिवदासानी. आज आफताब त्याचा वाढदिवस साजरा करत आहे.

आफताबचा जन्म २५ जून १९७८ रोजी मुंबईमध्ये झाला. त्याचे संपूर्ण शिक्षण मुंबईतच झाले. आफताब अगदी लहान असताना तो एका बेबीफूडच्या जाहिरातीमध्ये झळकला होता. त्यानंतर त्याने वयाच्या ९ व्या वर्षी बालकाकलार म्हणून ‘मिस्टर इंडिया’, ‘शहेंशाह’, ‘अव्वल नंबर’, ‘चालबाज’, ‘इंसानियत’ आदी सिनेमांमध्ये त्याने काम केले. पुढे त्याने वयाच्या १९ वर्षी राम गोपाळ वर्मा यांच्या ‘मस्त’ सिनेमातून उर्मिला मातोंडकरसोबत अभिनयात पदार्पण केले. हा सिनेमा तुफान गाजला. सोबतच या चित्रपटाने आफताबला अनेक पुरस्कार देखील मिळवून दिले.

यानंतर तो ‘कसूर’, ‘हंगामा’, ‘मस्ती’ आदी अनेक सिनेमांमध्ये दिसला. मात्र काही मोजके सिनेमे सोडले तर त्याला यश मिळाले नाही. ‘लव के लिए कुछ भी करेगा’, प्यार इश्क और मोहब्बत, ‘कोई मेरे दिल से पूछे’, ‘क्या यही प्यार है’, ‘आवारा पागल दीवाना’, ‘प्यासा’, ‘मुस्कान’, ‘कोई आप सा’, ‘बिन बुलाये बाराती’ इतर अनेक सिनेमे लागोपाठ फ्लॉप गेले. आफताब फ्लॉप सिनेमे देऊनही एक स्टार अभिनेता म्हणूनच ओळखला जातो. आफताब आजही अनेक सिनेमांमध्ये दिसतो. मात्र मुख्य भूमिकेत आफताबच्या सिनेमांना यश मिळाले नाही. आफताबच्या मल्टीस्टारर सिनेमांना आणि अडल्ट विनोदी सिनेमांना खूप यश मिळाले.

मात्र असे असूनही आफताब मोठ्या संपत्तीचा मालक आहे. अभिनयाव्यतिरिक्त आफताबचे स्वतःचे प्रोडक्शन हाऊस आहे आणि इतर कामातून तो वर्षाला ३ कोटींपेक्षा जास्त रुपये कमवतो. मुंबईमध्ये आफताबचे स्वतःचे मोठे आलिशान अपार्टमेंट आहे.

त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे झाले, तर त्याने निन दुसांजसोबत लग्न केले आहे. त्यांनी २०१४ साली लग्न केले होते मात्र पुन्हा २०१७ साली त्याने निनसोबत लग्न केले. निन ही ब्रिटिश इंडियन आहे. तसे पाहिले तर आफताब हा अभिनेते कबीर बेदी यांचा साडू आहे. कबीर बेदी यांची पत्नी परवीन दुसांज ही निन दुसांजची बहीण आहे. निन ही मॉडेलिंग करायची, सोबतच एका लक्झरी ब्रँड इंडस्ट्रीमध्ये सल्लागार म्हणून देखील कार्यरत होती. निन आणि आफताब यांनी २ वर्ष एकमेकांना डेट केले आणि त्यानंतर लग्न केले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘…चला परत जाऊया बालपणात’, म्हणत चित्र रंगवताना दिसली अभिनेत्री तेजश्री प्रधान

-हा नक्की फोटो आहे की व्हिडिओ? तेजस्विनी पंडितची लेटेस्ट पोस्ट पाहून चक्रावले नेटकरी

-‘३६५ डे’ फेम मिशेल मोरोनचे खासगी फोटो सोशल मीडियावर लीक; अभिनेत्याने पोस्ट शेअर करत व्यक्त केला राग


Leave A Reply

Your email address will not be published.