रितिका श्रोत्री ही मराठी सिनेसृष्टीतील प्रतिभावान कलाकारांपैकी एक आहे. याची झलक तिने माधुरी दीक्षित अभिनित ‘बकेट लिस्ट’ या मराठी चित्रपटात दाखवली आहे. या चित्रपटात तिच्या अभिनयाचे बरेच कौतुक झाले होते. ती चाहत्यांमध्ये तिच्या निरागस सौंदर्यासाठी ओळखली जाते. अभिनेत्री सोशल मीडियावर देखील बरीच सक्रिय असते. नेहमी आपले सुंदर सुंदर फोटो ती चाहत्यांसमोर सादर करत असते.
नुकतेच रितिकाने तिचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यांनी चाहत्यांना पुरते वेडे करून सोडले आहे. हे एकूण तीन फोटो आहेत, जे अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. यात रितिका कमालीची सुंदर दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावर निरागसता सहजपणे झळकत आहे. यातली खास गोष्ट म्हणजे, फोटोखालचे कॅप्शन. होय, फोटोपेक्षा अधिक फोटोखालचे कॅप्शन चर्चेत आले आहे.
हे सुंदर फोटो शेअर करत, रितिकाने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “मैं तो खड़ी थी आस लगाए, मेंहदी कजरा माँग सजाए देखी सुरतियां अपने पिया की, हार गई मैं तन मन को ऐ री सखी मोरे पिया घर आए.” फोटोप्रमाणे कॅप्शनही बरंच चर्चेत आलं आहे. तुम्ही पाहू शकता की, कशाप्रकारे चाहते फोटोवर कमेंट करून अभिनेत्रीचं कौतुक करत आहेत.
सोशल मीडियावर सक्रिय राहणाऱ्या या अभिनेत्रीने अलीकडेच इंस्टाग्रामवर ३ लाख फॉलोव्हर्स पूर्ण केले आहेत. तिने इंस्टाग्रामवर या संबंधित एक पोस्ट शेअर करत, तिच्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली होती. रितिकाने इंस्टाग्रामवर स्वतः चा एक फोटो शेअर केला होता. यात ती आनंदाने उडी मारताना दिसली होती.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-