Wednesday, December 4, 2024
Home कॅलेंडर सावत्र आई श्रीदेवींसोबत असे होते नाते, तर सलमानला मानतो आदर्श; जाणून घ्या अर्जुन कपूरबद्दल कधीही न ऐकलेल्या गोष्टी

सावत्र आई श्रीदेवींसोबत असे होते नाते, तर सलमानला मानतो आदर्श; जाणून घ्या अर्जुन कपूरबद्दल कधीही न ऐकलेल्या गोष्टी

आज बॉलिवूडचा हँडसम हंक म्हणून ओळखला जाणारा अर्जुन कपूर (arjun kapoor) त्याचा 37 वा वाढदिवस साजरा करत आहे. 2012साली ‘इशकजादे‘ सिनेमातून हिंदी चित्रपटांमध्ये पदार्पण करणाऱ्या अर्जुनने खूप कमी वेळात या क्षेत्रात त्याचे स्थान निर्माण केले. चित्रपटाची पार्श्वभूमी असणाऱ्या अर्जुनसाठी या क्षेत्रात येऊन त्याची ओळख तयार करणे सोपे नव्हते. अतिशय मेहनतीने अर्जुन आज स्टार झाला आहे. सध्या मलाईका अरोरासोबत नात्यात असल्यामुळे अर्जुन नेहमीच प्रकाशझोतात असतो. आज त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया त्याच्या आयुष्यातील काही गोष्टी.

अर्जुनचे बालपण
मोना कपूर आणि बोनी कपूर यांचा मुलगा असणारा अर्जुन लहानपणापासूनच फिल्मी वातावरणात लहानाचा मोठा झाला. लहान असतानाच बोनी कपूर यांनी मोना यांना घटस्फोट देऊन श्रीदेवी यांच्याशी दुसरे लग्न केले. त्यामुळे घरात खूपच तणावाचे वातावरण असायचे. सतत वाद आणि तणाव यामुळे अर्जुनच्या बालमनावर याचा खूप परिणाम झाला. परिणामी अर्जुन नैराश्यात गेला. त्यामुळे व्हायच्या 16व्या वर्षीच अर्जुनचे वजन प्रमाणापेक्षा वाढले. एका वेळेला तर त्याचे वजन 150किलो झाले होते. त्यामुळेच त्याला जास्तंच आजार देखील जडला.

सहायक दिग्दर्शक

काही काळ शिक्षण घेतल्यानंतर त्याने शिक्षण सोडून या क्षेत्रात प्रवेश केला आणि निखिल आडवाणी यांच्या ‘कल हो ना हो’ आणि ‘सलाम ए इश्क’ सिनेमांसाठी सहायक दिग्दर्शन म्हणून काम केले. पुढे तो ‘वॉन्टेड’ आणि ‘नो एन्ट्री’ सिनेमांसाठी सहायक निर्माता देखील झाला.

सलमान खान आदर्श 

जेव्हा अर्जुन सलमानच्या चित्रपटांसाठी ऑफ कॅमेरा काम करत होता, तेव्हा सलमानने त्याला वजन कमी करण्याचा सल्ला देत अभिनयात पदार्पण करण्याचे सांगितले. मात्र अस्थमा आजार असल्याने त्याला 10 सेकंदापेक्षा अधिक धावणे देखील शक्य नव्हते. पण सलमान खानने स्वतः अर्जुनकडून योग्य व्यायाम, डाएट सर्व करून घेतले. सलमानची फिटनेस त्याची बॉडी नेहमीच अर्जुनला प्रेरित करते. अर्जुनने देखील सांगितले आहे की, त्याला इंडस्ट्रीमध्ये आणण्यात सलमानचा मोठा हात होता. तो नेहमीच सलमानला त्याचा आदर्श मानतो.

इंडस्ट्रीमध्ये अर्जुनला 10 वर्ष पूर्ण

अर्जुनने ‘इशकजादे’ सिनेमातून 2012साली अभिनयात पदार्पण केले. यशराजच्या या सिनेमात अर्जुन आणि परिणीती मुख्य भूमीकेत होते. 10 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल अर्जुनने सांगितले होते की, “सिनेमा माझ्या जीवनातील एक जुनून आणि छंद आहे. मी जास्तीत जास्त सिनेमे करून स्वतःला अधिक चांगला अभिनेता बनवू इच्छितो.”

अर्पिता खानसोबत रिलेशनशिप

अर्जुन 18 वर्षाचा असताना सलमान खानची बहीण अर्पिताला डेट करत होता. एका मुलाखतीदरम्यान त्याने हे नाते मान्य देखील केले होते. मात्र 2 वर्षांनंतर त्यांचे नाते संपुष्टात आले.

श्रीदेवी यांच्याशी खराब नाते

अर्जुन लहान असतानाच बोनी यांनी श्रीदेवीजींसोबत लग्न केले होते. त्यामुळे अर्जुनने त्याच्या आईला त्रास होताना पाहिले होते. 2014 साली अर्जुनने एका कार्यक्रमात सांगितले होते की, त्याचे श्रीदेवीजींसोबत कधीच चांगले नाते होणार नाही आणि त्या त्याच्या आई देखील कधीच होऊ शकणार नाही. त्या फक्त त्याच्या वडिलांच्या पत्नी असतील.

जान्हवी, खुशीसोबतचे नाते :
श्रीदेवी यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे कोलमडून पडलेल्या बोनी कपूर, जान्हवी आणि ख़ुशी यांना आधार देण्यासाठी अर्जुन पुढे आला होता. त्यांच्या निधनानंतर अर्जुन जान्हवी आणि खुशीचा भाऊ होत त्यांना सांभाळत त्याने त्याचे कर्तव्य पार पाडले. श्रीदेवीजी यांच्या निधनानंतर या सर्व भाऊ बहिणींचे नाते सुरळीत झाले आहे.

होस्ट अर्जुन कपूर
एक अभिनेता म्हणून अर्जुन आपल्याला अनेक चित्रपटांमधून दिसतच असतो. सोबतच तो अनेक पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन देखील करतो. याशिवाय अर्जुनने छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो ‘खतरों के खिलाडी’ या शोच्या सातव्या पर्वाचे सूत्रसंचालन केले आहे.

मलायका अरोरासोबतचे नाते
2016 साली अर्जुनने मलायका अरोराला डेट करायला सुरुवात केली. या नात्याबद्दल त्यांनी कधीच समोर येऊन सांगितले नाही, मात्र मीडियामध्ये याची कुणकुण लागली आणि त्यांचे नाते जगासमोर आले. मलायका ही अर्जुनापेक्षा 12 वर्षांनी मोठी असल्याने, सुरुवातील यांना खूप ट्रोल केले गेले. सध्या हे दोघेही त्यांच्या आयुष्यात आणि नात्यात सुखी आहे.

अर्जुनची संपत्ती
एका रिपोर्टनुसार अर्जुनची एकूण संपत्ती 10 मिलियन डॉलर म्हणजेच 14 कोटींपेक्षा अधिक असून, तो वर्षाला 12 कोटींपेक्षा अधिक पैसे कमवतो. चित्रपटांसोबतच तो जाहिरातींमधूनही उत्पन्न मिळवतो. त्याच्याकडे अनेक मोठ्या गाड्यांचे कलेक्शन आहे. त्यात मर्सिडीड़ज ML350, ऑडी Q5, लैड रोवर डिफेंडर, होन्डा CRV आदी मोठ्या ब्रॅंड्सच्या गाड्यांचा समावेश आहे.(know unknown facts about arjun kapoor)

अधिक वाचा:
स्वतःचाच “त्या” सिनेमातील अभिनय पाहून दुखावलेल्या सतीश शाह यांनी ‘या’ कारणासाठी सोडले अभिनय क्षेत्र?

रामानंद सागर यांच्या ‘रामायण’वरही घातलेली दोन वर्षीची बंंदी; ‘हे’ आहे कारण

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा