Monday, April 15, 2024

रामानंद सागर यांच्या ‘रामायण’वरही घातलेली दोन वर्षीची बंंदी; ‘हे’ आहे कारण

बाॅलीवूड चित्रपटांवर टीका करणे हा सध्या ट्रेंडच सुरू झाला आहे. यावर्षी ‘पठाण‘ आणि ‘आदिपुरुष‘ चित्रपट रिलीज झाला आहे. या दोन्ही चित्रपटांवर जोरदार टीका करण्यात आली. क्रिती सेनाॅन आणि प्रभास स्टरर ‘आदिपुरुष’ चित्रपट चांगलाच वादाच्या भोवऱ्यात अडकला. पण तरीही या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर कोटींची कमाई केली. ओम राऊतच्या या चित्रपटात लोकांनी अनेक चूका काढल्या. तसेच या चित्रपटाची आणि रामानंद सागर यांच्या ‘रामायण‘ची तुलना करण्यात आली. पण तुम्हाला माहीत आहे का, त्या लोकप्रिय टीव्ही शोवरही तब्बल वर्षांची बंदी घालण्यात आली होती. सरकारने रामायणाच्या प्रसारणावर बंदी घातली होती. चला तर जाणून घेऊया ते कारण.

1987 मध्ये ‘रामायण‘चा (Ramayana)  पहिला भाग टिव्हीवर प्रसारित झाला होता. 78 भागांची ही मालिका सर्वांना इतकी आवडली होती की, आजही त्यातील पात्रांची देवासारखी पूजा केली जाते. 36 वर्षांनंतरही हा शो आजही लोकांच्या मनावर राज्य करतो. लहान मुलांपासून ते वृद्धापर्यंत सर्वांनाच ही मालिका खूप आवडते. पण ही मालिका प्रसारित करण्यापूर्वी निर्मात्यांना खूप खडतड प्रवास करावा लागला होता.

रामानंद सागर यांचे सुपुत्र प्रेम सागर लिहीलेल्या पुस्तकात अनेक गोष्टीचा खुलासा केलेला आहे. रामायण मालिकेला दूरदर्शनचे मालक आणि सरकार दोन्हीकडून कडाडून विरोध होता. तेव्हा रामानंद सागर यांनी तयार केलेले 3 पायलट एपिसोडही तेव्हा नाकारण्यात आले होते. सुनील लहरी यांनी सांगितले की, सीतेने स्लीवलेस ब्लाऊज परिधान केल्याचं दाखवल्याने दूरदर्शन आणि सरकारने या मालिकेवर आक्षेप घेतला होता.

एवढं होऊनही रामानंद सागर थांंबले नाहीत. दीपिका चिखलियाची सीतेची वेशभूषा पुन्हा तयार केली. त्यानंतरच हा शो लोकांसमोर आणला गेला. हे सगळ करायला जवळपास दोन वर्षे लागली होती. तोपर्यंत ही मालिका थांबवण्यात आली होती. (Ramanand Sagar’s ‘Ramayana’ was also banned twice)

अधिक वाचा- 
Death Anniversary: ऑक्सिजनच्या बेडवर झोपायचा 150 वर्षे जगण्याची इच्छा असणारा मायकल; 12 डॉक्टर्स रोज करायचे तपासणी
तब्बल 150 वर्षे जगण्यासाठी मायकल जॅक्सन झोपायचा ऑक्सिजन बेडवर; बूटामध्ये लपले होते डान्सचे गुपीत

हे देखील वाचा