Thursday, April 24, 2025
Home अन्य ‘कसौटी जिंदगी की’ फेम प्राचीन चौहानला अटक; मुलीची छेडछाड केल्याप्रकरणी दाखल झाला गुन्हा

‘कसौटी जिंदगी की’ फेम प्राचीन चौहानला अटक; मुलीची छेडछाड केल्याप्रकरणी दाखल झाला गुन्हा

एकता कपूरच्या लोकप्रिय शो ‘कसौटी जिंदगी की’ मधून टेलिव्हिजनवर पदार्पण करणारा अभिनेता प्राचीन चौहान याला मुंबई पोलिसांनी अटक केल्याची बातमी समोर आली आहे. एका मुलीची छेडछाड केल्याप्रकरणी त्याला अटक झाली आहे. अभिनेत्याच्या विरोधात पीडित मुलीने मलाड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. ( Kasauti zindagi ki fame actor prachin chauhan arrested for molestation charge)

पोलिसांनी भारतीय कायद्यानुसार त्याच्यावर 354, 342, 324, 506(2) हे कलम लावले आहेत. या बातमीने टेलिव्हिजन दुनियेत सर्वांना धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेता पर्ल पुरी याला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक केले होते. परंतु आता त्याला जामीन मिळाला आहे.

प्राचीन चौहानने स्टार प्लसवरील लोकप्रिय मालिका ‘कसौटी जिंदगी की’ मधून अभिनयाच्या करिअरला सुरुवात केली होती. या मालिकेमध्ये त्याने सुब्रतो बसु हे पात्र निभावले होते. यासोबतच त्याने ‘कुछ झुकी पलके’, ‘सिंदुर तेरे नाम का’, ‘सात फेरे’ या मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच त्याने कलर्स टीव्हीवरील ‘माता पिता के चरणों मे स्वर्ग’ या मालिकेत देखील काम केले आहे.

प्राचीन हा यूट्यूबवर शिट्टी आयडियाज ट्रेडिंग वेबसीरिज ‘प्यार का पंच’ मध्ये छवी मित्तल आणि पूजा गौरसोबत काम करत आहे. त्याची अभिमन्यूची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती. त्याला अटक केल्याप्रकरणी अद्याप त्याच्या मित्रांच्या प्रतिक्रिया समोर आल्या नाहीत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा