धक्कादायक! कला दिग्दर्शक राजू सापते यांची आत्महत्या; प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये घेतलं ‘या’ व्यक्तीचं नाव


मनोरंजन क्षेत्रात सतत छोट्या मोठ्या बातम्या कानावर येत असतात. नुकतीच एक धक्कादायक बातमी या क्षेत्रातून समोर आली आहे. माध्यमातील वृत्तानुसार सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक राजू सापते यांनी आत्महत्या केली आहे. त्यांनी पुण्यातील त्यांच्या राहत्या घरी आपले जीवन संपवले आहे. या बातमीने अवघ्या कला विश्वाला हादरवून सोडलं आहे.

महत्वाची बाब म्हणजे, राजू यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी त्यांच्या मरण्याचे कारण आणि त्यांच्या व्यथा देखील सांगितल्या आहेत. काम करत असताना एका युनियनचा पदाधिकारी त्रास देत असल्याचं त्यांनी यात सांगितलं आहे. (Art Director Raju Sapte Committed Suicide at Pune due to Mental Harassment)

आत्महत्येच्या अगोदर शेअर केलेल्या या व्हिडिओ राजू म्हणाले की, “नमस्कार मी राजेश मारुती सापते. मी एक आर्ट डिरेक्टर आहे. मी आता कोणतीही नशा केलेली नाही. पूर्ण विचाराअंती मी आता हा निर्णय घेत आहे. कारण मला काही गोष्टींचा खूप त्रास होत आहे. त्यातली ही गोष्ट आहे की, राकेश मौर्या जे लेबर युनियनमधून आहेत, ते मला खूप त्रास देत आहेत. माझं कुठच्याही प्रकारचं पेमेंट तिथे थकीत नाही. सगळं पेमेंट रेग्युलरली दिलेलं आहे. माझी कुठलीही कम्प्लेंट तिथे नाही. राकेश मौर्या युनियनमधील काही लेबर लोकांना मुद्दाम फोन करून त्यांच्याकडून ते वदवून घेत आहेत की राजू सापतेने पैसे दिलेले नाहीत.”

पुढे ते म्हणाले, “हे कालही मी क्लिअर केलं आहे की, नरेश मेस्त्री नामक व्यक्तीने फोन करून विचारले असता त्यांनीही सांगितले की माझे पेमेंट पूर्ण आहे. नरेश मेस्त्रींनी हेही सांगितलं की आजपर्यंत दादांनी कोणतही पेमेंट अर्धवट ठेवलेलं नाही. तरीही राकेश मौर्या हे मला खूप सतवत आहेत. ते माझं कुठचंही काम सुरु होऊ देत नाहीयत. सध्या माझ्याकडे 5 प्रोजेक्ट आहेत, ज्याचे काम मला तत्काळ सुरु करायचे आहे. त्यातलं एक प्रोजेक्ट झीचं मला सोडून द्यावं लागलं. कारण मला ते कामच करू देत नाहीयत. तसंच दशमी क्रिएशनचं काम सुरु असताना त्यांनी ते थांबवलं आहे. या गोष्टीचा निषेध म्हणून मी आज आत्महत्या करत आहे. मला न्याय देण्याचा प्रयत्न करावा.” असे म्हणत त्यांनी हे धक्कादायक पाऊल उचललं आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.