केंद्र सरकारच्या नवीन सेन्सर बोर्डच्या विधेयकाविरोधात एकवटले कलाकार; १४०० कलाकारांनी दाखल केली याचिका


केंद्र सरकारने सिनेमेटोग्राफ विधेयकात काही दुरस्ती केली आहे. यामध्ये लहान मुलांना चित्रपटगृहात चित्रपट बघण्यासाठी त्यांच्या वयाचा दाखला द्यावा लागणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे आता निर्माते त्रस्त झाले आहेत. तसेच चित्रपटगृहाच्या मालकांनी देखील यावर आक्षेप व्यक्त केला आहे. (Bollywood actors are against cenematograph act 2021)

खरंतर कोणताही चित्रपट प्रदर्शित होण्याआधी सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेटद्वारे मान्यता मिळावी लागते. सीबीएफसी तर्फे चित्रपटांना त्यांच्या दर्जानुसार ग्रेड दिल्या  जातात. परंतु आता जुन्या पद्धतीत केंद्र सरकारने काही फेरबदल केले आहेत. सरकार आता सिनेमेटोग्राफ कायदा १९५२ मध्ये दुरुस्ती करणार आहे. या कायद्याला सिनेमेटोग्रॉफ कायदा २०२१ असे संबोधण्यात येणार आहे. यात सेन्सर बोर्डने दिलेल्या प्रमाणपत्रात फेरबदल करण्याचा किंवा वेळ आल्यास ते रद्द करण्याचा अधिकार देखील केंद्र सरकारला असू शकतो.

सरकारच्या या नव्या चित्रपट धोरणामुळे चित्रपटसृष्टीतील अनेक निर्माते नाराजी व्यक्त करत आहेत. तसेच ते सरकारच्या या निर्णयाला निषेध व्यक्त करत आहेत. बॉलिवूडमधील अनुराग कश्यप, फरहान अख्तर, सुधीर मिश्रा यांच्यासह १४०० कलाकारांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला ऑनलाईन पत्र लिहिले आहे. तसेच केंद्र सरकारच्या या कायद्यावर २ जुलैपर्यंत सर्व सामान्य जनतेच्या प्रतिक्रिया मागवल्या आहेत. काहींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या निर्णयावर टीका केली आहे, तर काही निर्मात्यांनी सरकारचे समर्थन केले आहे. तसेच चित्रपटगृहाच्या मालकांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे.

आधीच संपूर्ण देशात कोरोना महामारी चालू आहे. त्यामुळे खूप नुकसान झाले आहे. त्यात सेन्सरच्या कायद्यातील दुरुस्तीचे नवीन नियमांचे संकट उभे राहिले आहे. केंद्राच्या हस्तक्षेपामुळे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर टांगती तलवार असणार आहे. अशी भीती प्रोडिसर्स गिल्ड ऑफ इंडियाचे सीईओ नितीन तेज आहुजा यांनी व्यक्त केली आहे.

केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे कोट्यवधीचे नुकसान होऊ शकते. कारण शेवटच्या क्षणी जर एखाद्या कलाकाराला, गाण्याला किंवा एखादा डायलॉग काढण्यास सांगितले, तर ते शक्य होणार नाही. तसेच थिएटर मालकांना देखील सरकारच्या या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. अशाप्रकारे जर बंधनं घातली, तर प्रेक्षक थिएटरऐवजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट पाहण्यास पसंती दर्शवतील अशी भीती व्यक्त केली जात आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.