टेलिव्हिजनवरील लोकप्रिय शो ‘गंदी बात’ या मालिकेतील अभिनेत्री गहिना वशिष्ठ हिला हृदय विकाराचा झटका आला आहे. ती आता हॉस्पिटलमध्ये दाखल झाली आहे. गहनाला पश्चिम मुंबईमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गहनाला कार्डीयोपल्मोनरी बायपास पंपवर ठेवले आहे. गहनाला शनिवारी (३ जुलै) हृदय विकाराचा झटका आला आहे. परंतु ही बातमी आज समोर आली आहे. (Gandi baat fame actress gahana Vasist admit in hospital after heart attack)
गहनाला डायबिटिस आहे. जर तिला वेळेवर इन्सुलिन मिळाले नाही, तर तिची तब्येत बिघडते. तिच्या घरी तिचा एक लहान भाऊ आणि वडील आहेत. पत्रकारांशी बोलताना गहनाच्या एक प्रवक्ता फ्लिन रेमेडिओस यांनी सांगितले की, शनिवारी (३ जुलै) रोजी अभिनेत्रीला हृदयाचा झटका आला होता. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल केले.
प्रवक्त्याने असे सांगितले की, “मी अजून तिला पाहिले नाही. मी आता तिला बघण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जाणार आहे. मला त्यांच्या बिल्डिंगमधील एका व्यक्तीकडून ही माहिती मिळाली आहे. मला अशी माहिती मिळाली आहे की, ती बेशुध्द आहे आणि कोणाशीही बोलत नाहीये. मी तिला हॉस्पिटलमध्ये भेटायला जाणार आहे आणि जे काही अपडेट असेल ते मी तुम्हाला देईल.” माध्यमातील वृत्तानुसार गहनाचे मेडिकल स्पेशालिस्ट डॉक्टर प्रणव काबरा देखील तिला भेटायला हॉस्पिटलमध्ये जाणार आहेत.
डॉक्टर प्रणव हे अनेक दिवसांपासून गहनाच्या डायबिटीसचा इलाज करत आहेत. गहनाला दुसऱ्या वेळेस हा झटका आला आहे. मागच्या वर्षी जेव्हा तिला झटका आला होता, तेव्हा ती तीन दिवस व्हेंटिलेटरवर होती. आता देखील तिची तब्बेत गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.
https://www.instagram.com/p/CKbUHeJF9yo/?utm_source=ig_web_copy_link
गहनाचे खरे नाव वंदना तिवारी हे आहे. तिने मिस आशिया बिकिनीचा ताज जिंकला आहे. तिने अनेक जाहिरातींमध्ये काम केले होते. तसेच तिने हिंदी आणि तेलुगू चित्रपटात काम केले आहे. या दिवसात तिच्यावर एक पोर्न व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर अपलोड केल्यामुळे केस चालू आहे. यासाठी तिला मड आयलंड येथून अटक केले होते. मागील ५ महिन्यांपासून ती जेलमध्ये होती. मागच्याच आठवड्यात तिला जामिन मिळाला आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…