‘फास्ट एँड फ्युरियस ९’ चित्रपटाने मोडले कमाईचे सर्व रेकॉर्ड्स; कोरोनातही केली तब्बल ‘इतक्या’ हजार कोटींची कमाई


कोरोना व्हायरस आल्यापासून आपल्या वैयक्तिक आयुष्यावर त्याचा खूप मोठा परिणाम झाला आहे. ‘घर एके घर’ एवढेच आपले विश्व मर्यादित झाले आहे. संसर्गजन्य आजार असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सरकारने सार्वजनिक ठिकाणे पूर्णपणे बंद केली आणि घरातच राहायची नामुष्की सर्वांवर आली. याचा सर्वात मोठा परिणाम मनोरंजनसृष्टीवर झाला. चित्रपटगृह बंद असल्याने प्रदर्शनासाठी तयार असलेले अनेक सिनेमे रखडले गेले. चित्रपटांसाठी वाईट काळ असलेल्या या कोरोनामध्ये हॉलिवूड सिनेसृष्टीसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे.

जगातल्या सर्वात चर्चेत असणाऱ्या चित्रपटांपैकी एक असणारा ‘फास्ट एँड फ्युरियस ९’ या सिनेमाने आतापर्यंत ५०० मिलियन डॉलर इतका व्ययसाय केला आहे. आपण जर भारतीय रुपयांमध्ये ही कमाई पाहिली, तर साधारण ३७२६ कोटी रुपये या सिनेमाने आतापर्यंत कमावले आहेत. हा आकडा यासाठी सर्वात आवश्यक आहे, कारण सर्व भाषांमध्ये प्रदर्शित झालेला हा सिनेमा डाऊनलोड करून पाहण्यात आला. सोबतच याची पायरसी देखील मोठ्या प्रमाणावर झाली.

आता प्रदर्शित झालेला ‘फास्ट एँड फ्युरियस’ हा या चित्रपटांच्या सीरिजचा ९ वा भाग आहे. या भागाची रसिकांना मागच्या बऱ्याच काळापासून प्रतीक्षा होती. कोरोनाकाळ सुरू झाल्याने या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले होते. मात्र, आता भारत सोडून सर्व देशांमध्ये चित्रपटगृह उघडले असल्याने हा सिनेमा २५ जूनला संपूर्ण जगात प्रदर्शित करण्यात आला.

जगातील अमेरिका आणि यूरोप देशांमध्ये या चित्रपटाला कोरोनाच्या सर्व अटी आणि नियमानुसार प्रदर्शित करण्यात आले असून चित्रपटगृहांमध्ये एक सीट सोडून लोकांना बसण्याची परवानगी देण्यात आली आहे. असे असूनही या सिनेमाने एवढी मोठी कमाई केली आहे. यावरूनच आपण अंदाज लावू शकतो की, लोकांमध्ये या चित्रपटाबाबत किती क्रेझ आहे.

जॉन सीना आणि विन डिझेल अशा मोठ्या आंतरराष्ट्रीय कलाकारांची भूमिका असलेला हा ऍक्शन थ्रिलर सिनेमा लोकांना प्रचंड आवडताना दिसत आहे. या चित्रपटातील कार रेसिंगच्या स्टंट्सने या सिनेमाला एक वेगळी ओळख मिळवून दिली. जाणकारांच्या म्हणण्यानुसार, हा चित्रपट लवकरच १००० मिलियनचा आकडा देखील पार करू शकतो.

भारतात कोरोनाची तिसरी लाट उंबरठ्यावर असल्याने अजूनही चित्रपटगृह सुरू झाले नाहीत. त्यामुळे हा सिनेमा भारतात प्रदर्शित झाला नाहीये. भारतातून देखील चित्रपटाच्या कमाईत मोठी वाढ होणार आहे. मात्र, चित्रपटगृह कधी उघडतात त्यावर हा सिनेमा आपल्याकडे कधी प्रदर्शित होईल ते ठरवले जाणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.