रिंकू राजगुरूने शेअर केले ‘फिट ऍंड फाईन’ लूकमधील फोटो; तर फिटनेस पाहून थेट दिशा पटानीशी होतेय तिची तुलना


सध्याच्या कोरोना काळात स्वतःच्या तंदुरुस्तीकडे लक्ष देणे खूप आवश्यक आहे. यावेळी आपण स्वतःला जितके फिट ठेऊ, तितके चांगले आहे. कलाकार मंडळी देखील स्वतः च्या फिटनेसकडे विशेष लक्ष देताना दिसत आहेत. याच फिट ऍंड फाईन कलाकारांमध्ये आता ‘सैराट’ फेम रिंकू राजगुरूचाही समावेश झाला आहे. होय चाहत्यांची लाडकी आर्चीही स्वतः च्या फिटनेसकडे विशेष लक्ष देतेय.

नुकतेच रिंकूचे काही फोटो समोर आले आहेत, ज्यात तिची कमालीची फिटनेस पाहायला मिळाली आहे. हे फोटो स्वतः रिंकूने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केले आहेत. तिने शेअर केलेल्या या दोन फोटोमध्ये ती शॉर्ट्समध्ये दिसली आहे. तिचे हे ट्रान्सफॉर्मेशन पाहून सर्वांनीच तोंडात बोटे घातली आहेत. तिचा हा हॉट अंदाज पाहून, ती सिनेसृष्टीतल्या ‘फिट ऍंड फाईन’ कलाकारांच्या यादीत सामील झाली आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

हे फोटो पोस्ट करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “स्माइल करा, ही एक नि: शुल्क चिकित्सा आहे.” हे फोटो पाहून रिंकूच्या चाहत्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे. या चर्चेचा परिणाम फोटोच्या कमेंट बॉक्समध्ये पाहायला मिळत आहे. चाहत्यांनी फोटोवर कौतुकांचा पाऊस पाडला आहे. एका युजरने लिहिले, “तू कितनी बदल गयी रे रिंकू.” तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “मराठी इंडस्ट्रीमधील दिशा पटानी.” (rinku rajguru shared her fit and fine look fans comparing her with disha patani)

रिंकूच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर ती आगामी काळात प्रार्थना बेहेरे, अभिनेता सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना या कलाकारांसोबत ‘छूमंतर’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर जोशी करत आहेत. तसेच रिंकूचा ‘झुंड’ हिंदी चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शिवाय ती हिंदी वेबसीरिज ‘जस्टिस डिलिव्हर्ड’ मध्येही दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.