टेलिव्हिजनवरील ‘राधा ही बावरी’ फेम अभिनेत्री श्रुती मराठे अनेक चित्रपटात आणि मालिकांमध्ये काम करून घराघरात पोहोचली आहे. तिच्या ‘राधा ही बावरी’ या मालिकेतील तिचे सरळ साधे आणि सालस पात्र सर्वांच्याच मनात घर करून गेले. पण पडद्यावर सालस दिसणारी श्रुती तिच्या वैयक्तिक आयुष्यात मात्र खूपच ग्लॅमरस आहे. श्रृतीचे काही ग्लॅमरस फोटो या दिवसात वेगाने व्हायरल होताना दिसत आहे.
या फोटोमध्ये श्रुती खूपच बोल्ड दिसत आहे. तिने गुलाबी रंगाचा स्लीव्हलेस वनपिस घातला आहे. तसेच सगळे केस मागे बांधले आहेत. त्यातील काही केस तिच्या चेहऱ्यावर आलेले आहेत. त्यामुळे ती खूपच छान दिसत आहे. तसेच तिने अत्यंत ग्लॅमरस अंदाजात पोज दिल्या आहेत.
यासोबतच तिने फोटोला दिलेल्या कॅप्शननेही सर्वांचे लक्ष वेधले आहे. तिने हा फोटो शेअर करून लिहिले आहे की, “हाय गर्मी.” (Marathi actress Shruti Marathi’s bold photo viral on social media)
श्रृतीचे हे फोटो तिच्या चाहत्यांना खूपच आवडले आहेत. सगळेजण प्रतिक्रिया देऊन तिचे कौतुक करत आहे. तिच्या या फोटोला शेअर करून केवळ 4 पेक्षा अधिक तास झाले आहेत. या फोटोला आतापर्यंत 50 हजारांपेक्षाही जास्त लाईक्स मिळाले आहेत. तिचे चाहते या फोटोवर खूप प्रतिक्रिया देत आहेत.
एका चाहत्याने कमेंट केली आहे की, “यार गजब आहेस तू.” दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले आहे, “ज्वालामुखी.” तिचे हे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत.
श्रृती मराठेच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने अनेक चित्रपटात काम केले आहे. तिने ‘तप्तपदी’, ‘प्रेमसूत्र’, ‘बंध नायलॉनचे’, ‘अरावण’, ‘शुभमंगल सावधान’, ‘इंदिरा विझा’ या चित्रपटात काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-नसीरुद्दीन शाह यांना ८ दिवसांनी मिळाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, मुलाने फोटो शेअर करत दिली माहिती










