Friday, March 29, 2024

नसीरुद्दीन शाह यांना ८ दिवसांनी मिळाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, मुलाने फोटो शेअर करत दिली माहिती

बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट भूमिका निभावून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अभिनेते म्हणजे नसीरुद्दीन शाह. त्यांच्या चाहत्यांसाठी एक गोड बातमी समोर आली आहे. त्यांना बुधवारी (7 जुलै) 8 दिवसांनंतर हॉस्पिटलमधून घरी सोडले आहे. त्यांना न्यूमोनिया झाल्यानंतर 29 जूनला मुंबईमधील खार येथील हिंदुजा रुग्णालयात दाखल केले होते. नसीरुद्दीन यांच्या मॅनेजरने सांगितले होते की, तपासणी दरम्यान डॉक्टरांना त्यांच्या फुफ्फुसात पॅच सापडला होता. त्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करायला सांगितले होते.

याआधी देखील त्यांची पत्नी रत्ना पाठक शाह यांनी सांगितले होते की, “शाह यांना न्यूमोनिया झाला आहे आणि आता त्यांची तब्बेत ठीक आहे. त्यांच्यावर होत असणाऱ्या उपचारांचा परिणाम दिसत आहे. आशा आहे की, ते लवकरच ठीक होतील.”

नसीरुद्दीन शाह यांचा मुलगा विवान शाह याने बुधवारी (7 जुलै) शाह यांना हॉस्पिटलमधून घरी आणल्याची बातमी दिली आहे. त्याने इंस्टाग्राम स्टोरीला नसीरुद्दीन शाह यांचे दोन फोटो शेअर केले होते. पहिल्या फोटोमध्ये ते त्यांची पत्नी रत्ना पाठक यांच्यासोबत होते, तर दुसऱ्या फोटोमध्ये ते एकटेच उभे आहेत. सोबतच शेजारी आरशात रत्ना पण दिसत आहेत. पहिल्या फोटोच्या कॅप्शनमध्ये विवानने लिहिले की, “बॅक होम.” तसेच दुसऱ्या फोटोमध्ये लिहिले की, “त्यांना आज सकाळी हॉस्पिटलमधून सुट्टी मिळाली आहे.” हे दोन्ही फोटो शाह त्यांच्या घरी पोहोचल्यानंतरचे आहेत.

Photo Courtesy: Instagram/therealvivaanshah

नसीरुद्दीन शाह यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात 1975 साली ‘निशांत’ या चित्रपटातून केली होती. त्यांनी ‘स्पर्श’ (1979), ‘जाने भी दो यारो’ (1983) तसेच ‘मासूम’ आणि ‘मिर्च मसाला’ यांसारख्या चित्रपटात काम केले. त्यांनी आतापर्यंत जवळपास 100 पेक्षाही अधिक चित्रपटात काम केले आहे. त्यांना तीन राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाले आहे. ते ‘मोटले प्रोडक्शन’ या नावाने एक थिएटर ग्रूप देखील चालवतात. (Naseeruddin Shah discharged from hospital, his son shear a photo on Instagram)

नसीरुद्दीन शाह यांनी सलग दोन दशकं सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी विशाल भारद्वाज यांचा 2009 मध्ये आलेला ‘इश्कियां’, विद्या बालन स्टरर ‘द: डर्टी पिक्चर,’ झोया अख्तरचा ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. ते या आधी शेवटचे 2020 मध्ये आलेला ड्रामा ‘रक्सम’ मध्ये दिसले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा