अजय देवगणच्या ओटीटी पदार्पणासोबतच कमबॅक करणार ‘ही’ अभिनेत्री; कित्येक वर्षांपासून आहे मोठ्या पडद्यापासून दूर


चित्रपटांइतकेच महत्व सध्याच्या काळात ओटीटी प्लॅटफॉर्मला मिळत आहे. वेबसीरिज आणि ओटीटीवर प्रदर्शित होणारे सिनेमे खूप गाजताना दिसत आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर आधी देखील बऱ्याच चांगल्या वेबसीरिज प्रदर्शित होत होत्या, पण तेव्हा हा प्लॅटफॉर्म पाहिजे तेवढा लोकप्रिय नव्हता. मात्र कोरोना काळात ओटीटीने लोकप्रियतेचा उच्चांक गाठला. या प्लॅटफॉर्मची लोकप्रियता पाहून बॉलिवूडमधील कलाकरांना देखील या प्लॅटफॉर्मची भुरळ पडली आणि अनेक कलाकारांनी ओटीटीवर पदार्पण केले. मग ते दिग्दर्शक म्हणून असो, निर्माता म्हणून असो किंवा अभिनेता म्हणून असो. सध्या अनेक कलाकार ओटीटीवर येण्यासाठी सज्ज झाले आहेत. यातलेच एक महत्वाचे नाव म्हणजे अजय देवगण.

आपल्या सर्वच चित्रपटांमधून प्रेक्षकांचे दमदार मनोरंजन करणारा अजय लवकरच ओटीटीवर पदार्पण करणार आहे. हे तर सर्वांनाच माहित आहे. अजय हॉटस्टारच्या ‘रुद्र’ या वेबसिरीजमध्ये काम करताना दिसणार आहे. आता याबद्दल अजून एक माहिती समोर येत आहे. या वेबसिरीजमधून बॉलिवूडमधील एक अभिनेत्री ओटीटीवर पदार्पण करतच आहे, सोबत ती अनेक वर्षांनी अभिनय करताना देखील दिसणार आहे.

या अभिनेत्रीचे नाव आहे, ईशा देओल. हो, धूम फेम ईशा देओल लवकरच ओटीटीवर पदार्पण करत आहे. मोठ्या पडद्यापासून बऱ्याच काळापासून दूर असणारी ईशा लवकरच ‘रुद्र’ वेबसिरीजमध्ये दिसणार आहे. खुद्द ईशाने याबद्दल ट्वीट करत याची माहिती दिली आहे. ईशा अजयसोबत या वेबसिरीजमधून कमबॅक करणार आहे.

ईशा या वेबसिरीजमध्ये एका महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ती अजयच्या पार्टनरची भूमिका साकारणार आहे. ईशाने तिच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, “मी ‘रुद्र’ सिरीजमधून पदार्पण करत आहे. ते पण अतिशय प्रतिभावान असलेल्या अजय देवगणसोबत. अजय अनेक चित्रपटांमध्ये माझा सहकलाकार होता.” या ट्वीटमुळे तिच्या या एन्ट्रीबद्दल आता फायनल झाले आहे.

ईशा आणि अजय या दोघांशिवाय या सिरीजमध्ये राशी खन्ना आणि हेमंत खेर हे देखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिरीजची शूटिंग लवकरच सुरु होणार आहे. ही सिरीज अप्लाउज एंटरटेनमेंटच्या अंतर्गत निर्मित होणार आहे. ही सिरीज ब्रिटिश सिरीज ‘लुथर’चा हिंदी रिमेक आहे. अजय लवकरच ‘भुज’ सिनेमात दिसणार आहे. सोबतच ‘मैदान’, ‘आरआरआर’, ‘मेडे’ मध्ये देखील दिसेल.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.