टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय आणि चर्चेत असणारा शो म्हणजे ‘तारक मेहता का उलटा चष्मा.’ या मालिकेतील पात्र आणि त्यांचा अभिनय खूप चर्चेत असतो. मालिकेतील चर्चेत असणाऱ्या बबिताजी म्हणजेच मुनमुन दत्ता होय. या मालिकेतून तिला खूप यश मिळाले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तिचे जबरदस्त फॅन फॉलोविंग देखील आहे. मुनमुनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशातच तिचा एक रील व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
मुनमुन दत्ताचा हा व्हिडिओ सध्या खूप चर्चेत आहे. या व्हिडिओपेक्षा जास्त चर्चा मुनमुनचा सहकलाकार टप्पू म्हणजेच राज अनादकद याची कमेंट. मुनमुनच्या व्हिडिओवर केलेल्या कमेंटमुळे राज सध्या चर्चेत आहे. त्याने व्हिडिओवर कमेंट करत एक हाय फाईव्ह ईमोजी पोस्ट केली आहे. त्याची ही कमेंट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या महिलेच्या व्हिडिओवर अशी कमेंट केल्यामुळे तो सध्या ट्रोल होत आहे. (Raj anadkad comment viral on munmun gupta’s Instagram reel)
एका युजरने राजच्या कमेंटला उत्तर देत म्हटले आहे की, “ती तुझी आँटी आहे.” दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे की, “हे काय आहे??”
मुनमुन दत्ता ही ‘तारका मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेतून घराघरात पोहोचली आहे. तिचे या मालिकेतील पात्र सर्वांना खूप आवडते. ती अनेक वेळा या मालिकेतील बिहाइंड द सीन सोशल मीडियावर शेअर करून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असते.
मुनमुन दत्ता ही 2008 पासून ‘तारका मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेत बबिता अय्यर ही भूमिका निभावत आहे. तिने 2004 साली ‘हम सब बाराती’ मधून तिच्या करिअरला सुरुवात केली होती. मागील अनेक दिवसापासून ती वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. जूनमध्ये तिच्या विरोधात हरियाणामधील हिसार आणि हांसी सोबत देशातील चार वेगवेगळ्या राज्यांमध्ये गुन्हे दाखल झाले होते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-करीना आणि सैफच्या दुसऱ्या मुलाचे नाव झाले फायनल; आजोबा रणधीर कपूर यांनी दिली माहिती
-जोहरा सेहगल यांना बिग बी म्हणाले होते, ‘१०० वर्षांची मुलगी’; तर मजेदार होती त्यांची शेवटची ईच्छा
-संस्कृती बालगुडेने घोड्यासोबत केलं फोटोशूट; हटके फोटोंना मिळतोय चाहत्यांचा प्रतिसाद