करीना आणि सैफच्या दुसऱ्या मुलाचे नाव झाले फायनल; आजोबा रणधीर कपूर यांनी दिली माहिती


बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडपं सैफ अली खान आणि करीना कपूर खान यांनी याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात त्यांच्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला आहे. त्यांनी अजूनही त्यांच्या मुलाचे नाव काय ठेवले आहे हे कोणाला सांगितले नव्हते. त्यांचे चाहते त्यांच्या या मुलाला बघण्यासाठी, तसेच त्यांचे नाव जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. अशातच सैफ आणि करीनाने त्यांच्या मूलाचे नाव जाहीर केले, आहे अशी माहिती समोर आली आहे. तसेच त्यांचा लहान मुलाचा चेहरा देखील दाखवला आहे. करीना कपूरच्या छोट्या मुलाचे नाव आणि चेहरा आजवर कोणी पहिला देखील नव्हता तरी देखील त्याची खूप चर्चा चालू होती. अशातच करीना कपूरचे वडील रणधीर कपूर यांनी त्यांच्या छोट्या नातवाचे नाव ‘जेह’ ठेवले आहे हे सांगितले आहे. ( Kareena Kapoor Khan and saif ali khan decided their socond son’s name)

करीना कपूर खानने अजूनही त्यांच्या छोट्या मुलाचे नाव जाहीर केले नाही. परंतु तिचे वडील रणधीर कपूर यांनी सांगितले की, घरात त्याला सगळे जेह या नावाने आवाज देतात. ई-टाईम्ससोबत बोलताना त्यांनी सांगितले की, एक आठवड्यापूर्वीच त्याचे नाव फायनल झाले आहे.

जेह हे इब्रानीमध्ये एका देवाचे नाव आहे. तसेच लॅटिनमध्ये या नावाचा अर्थ ‘ब्ल्यू क्रेस्टेड बर्ड’ असा होतो. माध्यमातील वृत्तानुसार, सैफ हा त्याच्या मुलाला त्याच्या वडिलांचे नाव देऊ इच्छितो. त्याच्या वडिलांचे नाव मंसूर अली खान पतौडी हे आहे. त्याला त्याचे मुलाचे नाव मंसूर हे ठेवायचे आहे. परंतु अजूनही या दोघांकडून कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही.

करीना कपूरने २१ फेब्रुवारीला तिच्या दुसऱ्या बाळाला जन्म दिला आहे. त्यानंतर तिने ८ मार्चला तिच्या मुलाची झलक दाखवली होती. त्यानंतर त्यांच्या मुलावरून अनेक चर्चा रंगल्या होत्या की, तो नक्की कोण सारखा दिसतो?? यावर सारा अली खानने सांगितले होते की, त्याची स्माईल तिच्यासारखी आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-संस्कृती बालगुडेने घोड्यासोबत केलं फोटोशूट; हटके फोटोंना मिळतोय चाहत्यांचा प्रतिसाद

-रोमँटिक हीरोपासून असे बनले ते ‘संस्कारी बाबूजी’; वाचा आलोकनाथ यांचा चित्रपटप्रवास

-‘…ही बट नॅचरल आहे!’ अमेय वाघच्या लेटेस्ट फोटोने वेधलं सोशल मीडियाचं लक्ष


Leave A Reply

Your email address will not be published.