संस्कृती बालगुडेने घोड्यासोबत केलं फोटोशूट; हटके फोटोंना मिळतोय चाहत्यांचा प्रतिसाद


मराठमोळ्या संस्कृती बालगुडेने आजवर अनेक चित्रपटात काम केले आहे. अवघडातली अवघड भूमिका संस्कृती अगदी सहजतेने पार पाडते. अतिशय निवडक चित्रपट आणि त्यातला उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर तिने इंडस्ट्रीमध्ये एक खास स्थान मिळवले आहे. तिच्या याच अंदाजामुळे तिचे लाखो चाहते आहेत. या चाहत्यांसाठी ती दरदिवशी तिचे फोटोशूट नाहीतर मग व्हिडिओ शेअर करते. चाहत्यांकडूनही तिच्या पोस्टला खूप प्रेम मिळते.

संस्कृती बालगुडे सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असते. नुकतेच तिने एक फोटोशूट केलं आहे, ज्याचे काही फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर आपल्याला पाहायला मिळतील. (sanskruti balgude’s photoshoot with horse goes viral on internet)

विशेष म्हणजे, या फोटोमध्ये संस्कृती घोड्यासोबत दिसली आहे. घोड्यासोबतच्या या ब्लॅक ऍंड व्हाईट फोटोशूटला चाहत्यांकडून तूफान पसंती मिळताना दिसत आहे. यात संस्कृतीचा लूकदेखील अप्रतिम आहे. तिचे लुक्स आणि हेअरस्टाईल सर्वकाही अगदी उत्तम आहे. यातील तिचा लूक अगदी किलर आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

अलीकडेच तिने पाण्यात फोटोशूट केलं होतं, जे देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं होतं. यातील तिच्या अदांनी सर्वाना वेड लावून सोडलं होतं. शिवाय संस्कृती अनेकदा असे हटके फोटोशूट चाहत्यांसाठी घेऊन येत असते. यामुळे तिच्या फॅन फॉलोविंगमध्ये देखील बरीच वाढ झाली आहे.

अभिनेत्रीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती अखेरच्या वेळेस ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ या चित्रपटात दिसली होती. तर लवकरच ती ‘८ दोन ७५: फक्त इच्छाशक्ती हवी’ या आगामी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात संस्कृतीसोबत अभिनेता शुभंकर तावडे, शर्वाणी पिल्लई, संजय मोने, आनंद इंगळे, ,राधिका हर्षे, अश्विनी कुलकर्णी, विजय पटवर्धन, चिन्मय संत, डॉ .निखिल राजेशिर्के असे कलाकार काम दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘एवढी नकारात्मकता आणता तरी कुठून?’ ‘सिडनाझ’बाबत पसरलेल्या बातम्यांवर सिद्धार्थचे उत्तर

-शिल्पा शेट्टी बराचद्या सापडलीय वादाच्या भोवऱ्यात; अंडरवर्ल्ड कनेक्शनचा होता आरोप, तर बोल्ड फोटोशूटमुळेही होती ती चर्चेत

-‘द कश्मीर फाइल्स’ सिनेमाच्या लाईन प्रोड्युसरने नैराश्यामुळे केली आत्महत्या; अनुपम खेर यांनी पोस्टद्वारे दिली माहिती


Leave A Reply

Your email address will not be published.