मागील काही काळापासून चित्रपटसृष्टीमध्ये रिमेकसोबतच सिनेमांचे पुढचे भाग काढण्याचा नवीन ट्रेंड आला आहे. एखादा सिनेमा हिट झाला असेल, तर त्याचा पुढचा भाग काढून प्रेक्षकांना पुन्हा आकर्षित केले जाते. याबाबतीत अनेक उदाहरण देता येतील. आता हाच ट्रेंड टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये देखील रुळताना दिसत आहे. जेव्हापासून वेबसिरीज आणि ओटीटी प्लॅटफॉर्मला सुगीचे दिवस आले आहेत, तेव्हापासून अनेकांना हा प्लॅटफॉर्म खुणावू लागला आहे.
डेलीसोप क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एकता कपूरनेही या माध्यमाचा वापर करत तिची सर्वात लोकप्रिय मालिका ‘पवित्र रिश्ता’चे नवीन पर्व पुन्हा आणायचे ठरवले आहे. झी टीव्हीवरील लोकप्रिय मालिका पवित्र रिश्ता तुफान गाजली होती. या मालिकेतील अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे यांच्या मुख्य भूमिका होत्या. या दोघांनाही या मालिकेतून अमाप लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळाली. या मालिकेतील सुशांतने साकारलेला मानव आणि अंकिताने साकरलेली अर्चना या दोन्ही भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनावर स्वतःची वेगळी छाप सोडली आहे. आज इतक्या वर्षांनीही ही मालिका प्रेक्षकांच्या मनात ताजी आहे. नुकतेच या मालिकेने १२ वर्ष पूर्ण केले
आहेत. आता ही मालिका नव्या ढंगात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
या मालिकेची घोषणा झाल्यापासूनच यात कोण कोण कलाकार असणार याची प्रेक्षकांना अतिशय उत्सुकता होती. मुख्य म्हणजे मानव आणि अर्चना या दोन भूमिका कोण साकारणार याबद्दल सर्वांनाच जाणून घ्यायचे होते. नुकतेच या मालिकेतील कलाकारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. सुशांत सिंग राजपूतने साकारलेल्या मानवच्या भूमिकेत अभिनेता शाहीर शेख दिसणार आहे . तर अर्चना म्हणून पुन्हा अंकिता लोखंडेची वर्णी लागली आहे. शाहीर आणि अंकिता यांचे लूक सोशल मीडियावर शेअर करण्यात आले होते. ते सर्व रसिकांना तुफान आवडत आहे. मालिकेच्या शूटिंगला सुरुवात झाली असून सेटवरचे काही फोटो समोर आले आहेत.
Sometimes in most ordinary lives, we find the most extraordinary love stories!
Witness the extraordinary love story of Manav and Archana. #PavitraRishta Filming begins; streaming soon on #ALTBalaji #ItsNeverTooLate@ektarkapoor @Shaheer_S @anky1912 @AsheemaVardaan @bcaunty pic.twitter.com/yIoHyjOGWk— ALTBalaji (@altbalaji) July 11, 2021
‘पवित्र रिश्ता २.०’ चे चित्रीकरण सुरू झाले असून, ’पवित्र रिश्ता २.०’ मालिकेचे प्रक्षेपण ओटीटीवर केले जाणार आहे. आणि आता अंकिता लोखंडे आणि शाहीर शेख स्टारर ‘पवित्र रिश्ता २.०’ ची पहिली झलक देखील समोर आली आहे.
‘पवित्र रिश्ता २.०’ चे शूटिंग सुरु झाले आहे. शाहीर आणि अंकिताच्या मालिकेचा पहिला लूक सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होताना दिसत आहे. ‘अल्ट बालाजी’ने त्यांच्या याची पहिली झलक शेअर केली आहे. या फोटोंमध्ये शाहीर आणि अंकिता लोखंडेसोबत ऊषा नाडकर्णी आणि रणदीप राय दिसत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-