सारा अली खानने दिली कामाख्या देवीच्या मंदिराला भेट; फोटो पाहून युजर्सने पाडला धर्मावरून प्रश्नांचा पाऊस


बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान हिचे आपण अनेक फोटो पाहिले आहेत. कधी फिरताना, कधी स्विमिंग करताना तर कधी ट्रेकिंग करताना. या वरून तिला भटकंतीची चांगलीच आवड आहे, ही गोष्ट लक्षात येते. कधी काश्मीर तर कधी मालदीवमधील फोटो तिने शेअर केले आहेत. नुकतीच सारा कामाख्या देवीच्या मंदिरात गेली होती. तेथील काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने पांढऱ्या रंगाचा ड्रेस आणि आसाममधील ट्रेडिशनल स्कार्फ घातला आहे. या लूकमध्ये ती खूपच सिंपल आणि सुंदर दिसत आहे. (Sara ali khan seeks blessings of Kamakhya Devi temple, user ask question about her religion)

सारा अली खानने हे फोटो शेअर करून लिहिले आहे की, “शांती, आभार आणि आशीर्वाद.” या फोटोमध्ये सारासोबत आणखी एक व्यक्ती दिसत आहे. जिने चेहऱ्यावर मास्क लावलेला दिसत आहे. ती कामाख्या देवी मंदिरात देवीचे दर्शन घेण्यासाठी गेल्यामुळे, काही चाहते तिचे खूप कौतुक करत आहेत. तर काहींना तिचे मंदिरात जाणे आवडले नाही. ते तिच्या या फोटोवर धर्मावरून प्रश्न उपस्थित करत आहेत.

पाहायला गेले तर ही काही पहिली वेळ नाहीये, जेव्हा सारा मंदिरात दर्शनासाठी गेली आहे. याआधी पण तिने अनेक धार्मिक देवस्थानाला भेट दिली आहे. जेव्हा ती बनारसमधील गंगा आरतीमध्ये सामील झाली होती, तेव्हा देखील तिला खूप ट्रोल केले होते. मुसलमान असल्याने तिने असे मंदिरात जाणे काही काहींना आवडले नाही. त्यामुळे तिला ट्रोल केले होते.

तिच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने नुकतेच आनंद एल राय यांच्या ‘अतरंगी रे’ या चित्रपटाची शूटिंग पूर्ण केली आहे. या चित्रपटात सारा अक्षय कुमार आणि साऊथ सुपरस्टार धनुषसोबत दिसणार आहे. तसेच आदित्य धर यांच्या ‘द : इम्मोर्टल ऑफ अश्वत्थामा’ या चित्रपटात ती विकी कौशलसोबत दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अभिनेता रोहित रॉयने सोशल मीडियावर शेअर केले फोटो; गजब ट्रान्सफॉर्मेशन पाहून तुम्हीही व्हाल थक्क

-अभिनेता प्रवीण डबासला मिळू शकले नाही अपेक्षित यश; मात्र तरीही आज लाखो चाहत्यांच्या हृदयावर करतो तो राज्य

-जर्मनमध्ये जन्मलेली एवलिन शर्मा बोलते तब्बल आठ भाषा; लग्नानंतर दोन महिन्यातच अभिनेत्रीने दिली गोड बातमी


Leave A Reply

Your email address will not be published.