Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

लक्झरी कार विकत घेऊन चांगलाच फसला थालापती विजय; कोर्टाने ठोठावला ‘इतके’ लाख रुपयांचा दंड

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार थालापती विजय या दिवसात त्याच्या 9 वर्ष जुन्या एका घटनेमुळे संकटात  सापडला आहे. त्याच्यावर मद्रास हायकोर्टाने एक लाख रुपयांचा दंड आकारला आहे. त्याच्यावर असा आरोप आहे की, त्याने 2012 मध्ये एक लक्झरी कार लंडनवरून मागवली होती. त्याने त्या कारचा टॅक्स भरला नव्हता. त्यामुळे हायकोर्टाने त्याच्यावर एक लाख रुपयाचा दंड आकारला आहे.

थालापती विजयने 2012 मध्ये इंग्लंडवरून त्याच्यासाठी रोल्स रॉयल्स घोस्ट कार मागवली होती. त्यावेळी विजयने मद्रासमधील हाय कोर्टामध्ये याचिका दाखल करून त्याच्यावर लावलेले एन्ट्री टॅक्स माफ करण्याची विनंती केली होती. आता नऊ वर्षाने हायकोर्टाने अभिनेत्याची याचिका फेटाळून सांगितले की, तो टॅक्स देण्यापासून वाचण्याचा प्रयत्न करते आहे. (Madras High court imposes fine one lakh on actor vijay fir not paying entry tax)

अशातच हाय कोर्टाने विजयवर टॅक्स न भरल्याच्या आरोपाखाली एक लाख रुपयांचा दंड आकारला आहे. न्यायमूर्ती एसएम सुब्रह्मण्यम विजयने केलेली याचिका फेटाळत म्हणाले की, “अभिनेत्यांचे लाखो चाहते आहेत. ते सगळे चाहते कलाकारांना सुपरहिरो मानतात. तमिळनाडूसारख्या राज्यात कलाकार राज्याला चालवणारे देखील बनले आहेत. त्यांच्याकडून अशा गोष्टींची अपेक्षा नाहीये की, त्यांनी फक्त खऱ्या हिरो प्रमाणे वागावे. टॅक्सच्या चोरीला राष्ट्रविरोधी विचार आणि मानसिकता मानली पाहिजे.”

थालापतीच्या कामाबाबत बोलायचे झाल्यास, तो याआधी शेवटचा ‘मास्टर’ या चित्रपटात दिसला होता. हा चित्रपट या वर्षाच्या सुरुवातीला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत विजय सेतूपती मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटाला दोन्ही कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला होता. ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील या चित्रपटातील प्रेक्षकांना खूप प्रेम मिळाले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-भारीच ना! मिलिंद सोमण यांच्या लग्नाला तीन वर्षे पूर्ण; रोमँटिक फोटो शेअर करून दिल्या पत्नीला शुभेच्छा

-अली गोनीकडे सध्या नाहीये कोणताच प्रोजेक्ट; वाढलेलं वजन आहे का यामागचं कारण??

-‘मी अंतर्वस्त्र घालायचे की नाही, ही माझी चॉईस…’, कपड्यांवरून ट्रोल करणाऱ्यांना हेमांगी कवीने दिली जोरदार चपराक

हे देखील वाचा