भारीच ना! मिलिंद सोमण यांच्या लग्नाला तीन वर्षे पूर्ण; रोमँटिक फोटो शेअर करून दिल्या पत्नीला शुभेच्छा


बॉलिवूड अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमण आणि पत्नी अंकिता कोनवार यांच्या लग्नाला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांनी आपल्या लग्नाचा तिसरा वाढदिवस साजरा केला आहे. त्यांनी पत्नी अंकिता कोनवार हिला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी शुभेच्छा देत सोशल मीडियावर त्यांचे अनेक फोटो शेअर केले आहेत.

मिलिंद सोमण आणि अंकिता कोनवार यांनी सोमवारी (१२ जुलै) त्यांच्या लग्नाचा तिसरा वाढदिवस साजरा केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या फोटोमध्ये त्यांची जबरदस्त केमिस्ट्री दिसत आहे. (Milind soman celebrate his third wedding anniversary, share photos with Ankita konvar to give her best wishesh)

त्यांनी सोशल मीडियावर त्यांच्या पत्नीसोबतचा रोमँटिक फोटो शेअर करून लिहिले आहे की, “लग्नाच्या तिसऱ्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अंकिता कोनवार. प्रत्येक क्षणी तुझी आणि तुझ्या वेड्या गोष्टींची आठवण येत असते.”

ते दोघे अनेक वेळा ऍडव्हेंचर ट्रिपला जात असतात. त्यांचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्या दोघांनी 2018 साली लग्न केलं आहे. त्यांची केमिस्ट्री सोशल मीडियावरून नेहमीच चाहत्यांना दिसत असते.

मिलिंद सोमण आणि अंकिता दोघेही फिटनेस प्रेमी आहेत. त्यांचे योगा करताना फोटो आणि व्हिडिओ देखील ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्या दोघांच्या वयातील अंतरामुळे त्यांना अनेक वेळा ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. अंकिता ही त्यांच्यापेक्षा 28 वर्षांनी लहान आहेत. तरी देखील त्यांच्यातील केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडत असते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-इतिहासातील सोनेरी पान : बाजीप्रभूंच्या शौर्याची गाथा सांगणाऱ्या ‘पावनखिंड’ चित्रपटाचं पहिलं पोस्टर रिलीझ

-अली गोनीकडे सध्या नाहीये कोणताच प्रोजेक्ट; वाढलेलं वजन आहे का यामागचं कारण??

-‘मी अंतर्वस्त्र घालायचे की नाही, ही माझी चॉईस…’, कपड्यांवरून ट्रोल करणाऱ्यांना हेमांगी कवीने दिली जोरदार चपराक


Leave A Reply

Your email address will not be published.