Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

व्हायरल व्हिडिओला प्रतिक्रिया देत, धर्मेंद्र यांनी नातू करण देओलचे केले कौतुक; म्हणाले, ‘तू तुझ्या पंजीसारखा…’

कलाकार आणि सोशल मीडिया यांचे एक जवळचे नाते आहे. कलाकार नेहमीच त्यांच्या आयुष्यातील अनेक घटनांचा खुलासा सोशल मीडियावर करत असतात. त्यांच्या चाहत्यांना देखील यांच्या बाबतीत सगळ्या उपडेट जाणून घेण्यात खूप रस असतो. बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र हे देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. ते त्यांच्या जुन्या आठवणी सोशल मीडियावर शेअर करत असतात. धर्मेंद्र हे केवळ त्यांच्या मुलांच्या नाही तर त्यांच्या नातवांच्या देखील खूप जवळ आहेत. त्यांनी नुकतेच त्यांचा नातू सनी देओल याला बघून त्याचे खूप कौतुक केले आहे. त्यांनी सोशल मीडियावर सांगितले आहे की, तो अगदी त्याच्या पंजीसारखा दिसतो. 

धर्मेंद्र यांनी ट्विटरवर नातू करण देओलचा एक व्हिडिओ शेअर करून, त्याच्यावर प्रेम दाखवले आहे. त्यांनी लोकप्रिय सेलिब्रिटी व्हायरल भयानी‌ यांनी शेअर केलेला व्हिडिओ ट्वीट केला आहे. या व्हिडिओमध्ये करण लहान मुलांसोबत दिसत आहे. जे रस्त्यावर छोट्या-छोट्या गोष्टी विकून त्यांचा दिवस घालवत असतात. जेव्हा या लहान मुलांनी करणकडे फोटो मागितला, तेव्हा त्याने मुलांचे मनोरंजन केले आणि त्यांना‌ फोटो दिला.

हा व्हिडिओ शेअर करून धर्मेंद्र यांनी लिहिले आहे की, “करण खूप मिळून मिसळून राहतो. तू अगदी तुझ्या पंजीसारखा नम्र आहेस. हे तुला नशिबाने मिळाले आहे. हे असचं टिकवून ठेव. ही खूप चांगली गोष्ट आहे. तुला खूप प्रेम.” (Dharmendra shares her grandson karan deols video says you are like your grand mother)

धर्मेंद्र यांनी शेअर केलेल्या या पोस्टवर त्यांचे चाहते खूप कमेंट करत आहेत. सगळेजण कमेंट करून करणचे कौतुक करत आहे. सगळेजण त्याला खूप चांगल्या मनाचा म्हणत आहेत.

करण देओल याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. त्याने २०१९ मध्ये ‘पल पल दिल के पास’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्याच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा काही खास प्रतिसाद मिळाला नाही. परंतु तो आता त्याच्या आगामी चित्रपटासाठी बरीच मेहनत करत आहे आणि प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण करण्याचा प्रयत्न करता आहे.

निक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अभिनयाच नव्हे, तर अभ्यासातही अव्वल आहे सारा; ‘या’ अवघड विषयात १०० टक्के मिळवत केलं होतं तिने टॉप

-‘कुंदन’ बनत बॉलिवूडमध्ये प्रवेश करणाऱ्या धनुषने केवळ सहा मिनिटात लिहिले होते ‘कोलावेरी डी’; वाचा त्याचा सिनेप्रवास

-आपली ‘आयडल’ माधुरी दीक्षितला हटके अंदाजात ट्रिब्यूट देणार नोरा फतेही; ‘चंद्रमुखी’च्या अवतारात दिसली अभिनेत्री

हे देखील वाचा