आपली ‘आयडल’ माधुरी दीक्षितला हटके अंदाजात ट्रिब्यूट देणार नोरा फतेही; ‘चंद्रमुखी’च्या अवतारात दिसली अभिनेत्री


बॉलिवूडमध्ये अनेक अजरामर चित्रपट बनत असतात. यातील एक माधुरी दीक्षितचा ‘देवदास’ हा चित्रपट आजही तितकाच लोकप्रिय आहे. आजही प्रेक्षक हा चित्रपट बघण्यासाठी कंटाळत नाही. या चित्रपटात माधुरी दीक्षितने मुख्य भूमिकेत काम केले होते. ती सध्या ‘डान्स दीवाने’ या शोचे परीक्षण करत आहे. या शोमध्ये नोरा फतेही ‌देखील आहे. या विकेंडला नोरा माधुरी दीक्षितसाठी काहीतरी स्पेशल करणार आहे. या एपिसोडमध्ये नोरा माधुरी दीक्षितप्रमाणे तयार होणार आहे. याआधी एकदा नोराने माधुरीच्या बायोपिकमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. 

नोराने अनेकवेळा माध्यमांसमोर या गोष्टीचा स्वीकार केला आहे की, ती माधुरी दीक्षितला तिची प्रेरणा मानते. डान्स दीवानेमध्ये येणाऱ्या काही एपिसोडमध्ये नोरा ही ‘देवदास’ चित्रपटातील चंद्रमुखीच्या अवतारात दिसणार आहे. तिने अगदी त्याप्रमाणे ड्रेस आणि मेकअप देखील केला आहे. ती डान्स दीवानेच्या मंचावर ‘डोला रे डोला’ या गाण्यावर डान्स करून माधुरी दीक्षितला ट्रिब्यूट देणार आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. तसेच सगळे चाहते तिला या अशा गेटअपमध्ये पाहून खूपच खुश झाले आहेत. सगळे आता आगामी एपिसोडची वाट पाहत आहे. नोरा ही माधुरी दीक्षितची खूप मोठी चाहाती आहे. तिने या शोमध्ये आधी देखील माधुरी दीक्षितसोबत डान्स केला आहे. (Nora fatehi will give tribute to Madhuri Dixit on dance deewane stage)(Nora fatehi will give tribute to Madhuri Dixit on dance deewane stage)

नोरा ही एक उत्कृष्ट डान्सर तसेच अभिनेत्री आहे. तिने अनेक गाण्यांमध्ये डान्स केला आहे. तिच्या ‘दिलबर’ या गाण्याने तर सगळ्या गाण्यांचे रेकॉर्ड तोडून टाकले होते. नंतर ती ‘स्ट्रीट डान्सर ३’ मध्ये देखील दिसली होती. तिने ‘साकी साकी’, ‘कमरीया’, ‘एक तो कम जिंदगानी’ या सुपरहिट गाण्यांवर डान्स केला आहे. तसेच तिचे ‘हाय गर्मी’ हे गाणे लोकप्रिय झाले होते. ती लवकरच ‘सत्यमेव जयते २’ या चित्रपटात दिसणार आहे. तसेच ती अजय देवगण आणि सोनाक्षी सिन्हासोबत ‘भुज : द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटात देखील दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-रिंकू राजगुरुने पहिल्यांदाच केले प्रोफेशनल फोटोशूट; लक्षवेधी ठरतेय त्यावर ईशान खट्टरची ‘ही’ कमेंट

-राजकुमार हिरानींच्या आगामी चित्रपटात दिसणार किंग खान; सोबतच झळकणार या ‘तीन’ प्रसिद्ध अभिनेत्रीही

-सुनील पालने ‘द फॅमिली मॅन’साठी मनोज बाजपेयींवर साधला निशाणा; म्हणाला, ‘इतका निर्लज्ज व वाया गेलेला माणूस…’


Leave A Reply

Your email address will not be published.