दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीपासून ते बॉलिवूडपर्यंत प्रवास करणारा लोकप्रिय अभिनेता सोनू सूद आज शुक्रवारी (३० जुलै) त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. आज तो त्याचा ४८ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याला त्याचे सगळे चाहते शुभेच्छा देत आहेत. बॉलिवूडमधील अनेक कलाकार त्याला शुभेच्छा देत आहेत. त्याला शुभेच्छा देण्यासाठी त्याची मैत्रीण आणि दिग्दर्शक कोरिओग्राफर फराह खानने देखील एक व्हिडिओ शेअर केला आहे.
फराह खानने तिच्या या खास मित्राला एक वेगळ्याच अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करून तिने लिहिले आहे की, “तुला माहित आहे का, तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस. जेव्हा तुम्हाला माहीत असते की, त्याचा वाढदिवस तुम्ही त्याला भांडी घासायला सांगून देखील साजरा करू शकता. हॅप्पी बर्थडे सोनू. तुझ्यासोबत शूट करून खूप छान वाटले. अशक्य गोष्टींना शक्य करत रहा आणि खूप पुढे जा. खूप प्रेम.”
त्यांचा हा व्हिडिओ खूप मजेशीर आहे. व्हिडिओमध्ये फराह सोनूसोबत दिसत आहेत. व्हिडिओमध्ये फराह त्याला म्हणते की, “सोनू आज तुझा वाढदिवस आहे. बघ आज मी तुझ्यासाठी किती जेवण बनवले आहे.” यावर सोनू म्हणतो की, “पकवू नकोस यार फराह. हे सगळं साफ कोण करणार आता? सांग ना?” तेव्हा फराह म्हणते की, “ही सगळी भांडी कोण घासणार ?? आता तूच घासणार, चल घास पटकन.”
सोनू पुढे म्हणतो की, “हॅप्पी न्यू इयरपासून फराह सगळ्यांकडून हे करून घेत आहे, ते आजपर्यंत चालू आहे. लव्ह यू फराह.” यानंतर फराह म्हणते की, “हॅप्पी बर्थडे सोनू.” त्यांचा हा व्हिडिओ प्रेक्षकांना खूप आवडला आहे. सगळेजण या व्हिडिओवर कमेंट करत आहेत. (Sonu Sood washing dishes on her birthday ordered by Farah khan)
फराह खानचा चित्रपट ‘हॅपी न्यू इयर’मध्ये सोनू सूदने काम केले होते. त्या दोघांनी नुकतेच एक व्हिडिओ देखील शूट केला आहे. सोनू सूदने अनेक चित्रपटात काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘मेहंदी लगा के रखना’ गाण्याचं इंग्लिश व्हर्जन ऐकून प्रियांका चोप्रा झाली लोटपोट! तुम्ही ऐकलं का?
-‘तेरे चेहरे से नजर नहीं हटती, नजारे हम क्या देखे!’, शालूच्या फोटोने पुन्हा उडवली चाहत्यांची झोप
-पारदर्शी साडीतील ‘तो’ सीन अन् दाऊदसोबतचे नाते, जाणून घ्या मंदाकिनीबद्दल ‘या’ गोष्टी










