Wednesday, March 25, 2026
Home मराठी सई ताम्हणकर वेगळ्याच रूपात येणार प्रेक्षकांच्या भेटीला, सोशल मीडियावर शेअर केला ‘तमिळ’ वेबसिरीजचा पोस्टर

सई ताम्हणकर वेगळ्याच रूपात येणार प्रेक्षकांच्या भेटीला, सोशल मीडियावर शेअर केला ‘तमिळ’ वेबसिरीजचा पोस्टर

मराठी चित्रपटसृष्टीतील अत्यंत डॅशिंग आणि ग्लॅमरस अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. सई सध्या जोरदार चर्चेत आहे. मराठी इंडस्ट्रीमध्ये तिचा चांगलाच दबदबा आहे. पण आता बॉलिवूडमध्ये देखील ती चांगलीच प्रसिद्ध झाली आहे. तसेच वेबसिरीज ‘समांतर’नंतर तिची सर्वत्र चर्चा होतीच, पण नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘मिमी’ या चित्रपटानंतर, आता बॉलिवूडमध्ये देखील तिचे चांगलेच गुणगान गायले जात आहे. या चित्रपटात तिने क्रिती सेननच्या मैत्रिणीची भूमिका निभावली आहे. तिचे हे पात्र प्रेक्षकांना खूप आवडले आहे. त्यामुळे सध्या सईची सर्वत्र वाहवा चालू आहे. अशातच सईची आणखी एक तमिळ वेब सिरीज प्रदर्शित झाली आहे.

सईने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून या सिरीजचा पोस्टर शेअर करून या गोष्टीची माहिती सर्वांना दिली आहे. तिची ही वेबसिरीज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे. तिच्या या वेब सीरिजचे नाव ‘नवरसा’ हे आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी या सिरीजचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. आता प्रेक्षकांना ही वेबसिरीज नेटफ्लिक्सवर पाहता येणार आहे. यात सईचा एक वेगळाच आणि कधीही न पाहिलेला अवतार पाहायला मिळणार आहे. ही वेब सिरीज नऊ मानवी भावनांवर आधारित असणार आहे. सईने शेअर केलेला हा पोस्टर तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. तसेच तिला एका वेगळ्या भूमिकेत बघण्यासाठी सगळे खूप उत्सुक झाले आहेत. (sai tamhankar share her Navarasa webseries poster on social media)

सई ताम्हणकरच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने ‘सनई चौघडे’ या चित्रपटांमधून मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले. सोबत टेलिव्हिजनवर देखील काम केले आहे .तिने ‘या गोजिरवाण्या घरात’, ‘अग्निपरीक्षा’ यांसारख्या टीव्ही मालिकांमध्ये काम करून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. नंतर तिने मराठी चित्रपटसृष्टीत खूप वेगाने भरारी घेतली. तिने ‘दुनियादारी’, ‘प्यार वाली लव्ह स्टोरी’, ‘वजनदार’, ‘क्लासमेट’ यांसारखे सुपरहिट चित्रपट केले आहेत. सोबत तिने हिंदी चित्रपटसृष्टीमध्येही तिचे कमालीचे नाव कमावले आहे. तिने हिंदीमध्ये ‘हंटर’ या चित्रपटात काम केले आहे. तसेच तिने नुकतेच ‘मिमी’ या चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटात तिने क्रिती सेनन, पंकज त्रिपाठी यांच्यासोबत काम केले आहे. या चित्रपटातील तिचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-स्वीटू-ओमचं लवकरच होणार लग्न? ‘त्या’ फोटोमुळे प्रेक्षकांमध्ये चर्चेला उधाण

-कराऱ्या नजरेने घायाळ करणाऱ्या कियाराचा ‘हा’ फोटो पाहिला का? कलरफुल आऊटफिट गजब दिसतेय अदाकारा

-हीना पांचाळचे ठुमके पाहून हरपले चाहत्यांचे भान; भन्नाट डान्स व्हिडिओ झाला व्हायरल

 

हे देखील वाचा