Tuesday, June 24, 2025
Home कॅलेंडर एका फॅनने ‘या’ अभिनेत्रीसोबत लग्न करण्याची इच्छा नवऱ्यासमोरच केली व्यक्त, नवऱ्याने दिले मस्त उत्तर

एका फॅनने ‘या’ अभिनेत्रीसोबत लग्न करण्याची इच्छा नवऱ्यासमोरच केली व्यक्त, नवऱ्याने दिले मस्त उत्तर

टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील क्युट कपल म्हणून शोएब इब्राहिम आणि दीपिका कक्कड ओळखले जातात. ह्या दोघांची जोडी अतिशय लोकप्रिय आहे. सोशल मेडियाव खूप सक्रिय असणाऱ्या या दोघांना फॅन फॉलोविंग देखील भरपूर आहे. दीपिका, शोएब नेहमी सोशल मीडियावर त्यांच्या नवनवीन पोस्ट, फोटो, व्हिडीओ शेयर करत असतात. नुकतेच शोएबने इंस्टाग्रामवर Ask Me Anything या सेशनमध्ये त्याच्या आणि दीपिकाच्या फॅन्सने त्याला काही प्रश्न विचारले आणि शोएबने देखील दिलखुलासपणे या प्रश्नांची उत्तर दिली. नवीन वर्षाच्या निमित्ताने त्याने फॅन्ससोबत संवाद साधला.

या सेशनमध्ये त्यांच्या एका फॅन एक विचित्र इच्छा बोलून दाखवली. त्याने शोएबला सांगितले ” मला दिपिकासोबत लग्न करायचे आहे.” यावर शोएबने मस्त दिले , ‘भावा दीपिका तर आता माझी झाली आहे, जर पुढचा जन्म असे तर काहीतरी चांगले काम कर म्हणजे दीपिका सारखी चांगली बायको मिळेल कारण तेव्हा सुद्धा दीपिका माझी असेल.’
दुसऱ्या एका फॅनने विचारले देव न करो पण जर आयुष्यात कधी अशी परिस्थिती आली की तुला कोणाला एकाला निवडावे लागले तर तू, आई, वडील आणि दीपिका मधून कोणाला निवडशील ? यावर शोएबने उत्तर दिले अरे बिनधास्त राहा अशी वेळ कधीच येणार नाही. काल्पनिकच प्रश्न विचारायचे असतील तर जरा चांगले विचारा.

शोएबची ही सवय दीपिकाला त्रासदायक ठरते; 
काही दिवसांपूर्वी दीपिकाने तिच्या नणंदेच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक व्हिडीओ तयार केला होता ज्यात तिने सांगितले की, “रोज सकाळी शोएब त्रासलेला असतो. त्यामुळे आमच्यात खूप भांडण होतात, शोएब सकाळी खूप शांत असतो, त्याला सकाळी जास्त बोलले आवडत नाही. जर कोणी त्याच्याशी बोलायचं प्रयत्न केला तर त्याला खूप राग येतो. सुरुवातीला मला या सवयीचा खूप त्रास झाला, पण नंतर मी स्वतःला जुळवून घेतले.”

शोएब आणि दीपिका ‘ससुराल सिमर का’ मालिकेत एकत्र काम करत असताना एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी फेब्रुवारी २०१८ मध्ये लग्न केले. दीपिका नुकतीच ‘कहां हम कहां तुम’ मालिकेत दिसली होती.

हे देखील वाचा