Sunday, January 18, 2026
Home बॉलीवूड अनिल कपूरच्या घरात पुन्हा एकदा वाजणार सनई चौघडे, लाडकी लेक रिया लवकरच चढणार बोहल्यावर

अनिल कपूरच्या घरात पुन्हा एकदा वाजणार सनई चौघडे, लाडकी लेक रिया लवकरच चढणार बोहल्यावर

बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा काही सनई चौघडे वाजणार आहेत. अशीच एक बातमी समोर आली आहे, जे ऐकल्यानंतर चाहते आनंदी होतील. ही बातमी अनिल कपूरची मुलगी आणि सोनम कपूरची बहीण रिया कपूरशी संबंधित आहे. खरं तर रिया कपूर ही तिचा बॉयफ्रेंड करण बूलानीशी लग्न करणार आहे. होय हे खरं आहे की, सोनम कपूरनंतर आता तिची बहीण रिया कपूरसुद्धा लग्नबंधनात अडकणार आहे. असे म्हटले जाते की, रिया बऱ्याच काळापासून करण बूलानीला डेट करत आहे. दोघेही जवळपास १३ वर्षांपासून एकमेकांच्या प्रेमात आहेत. अशा परिस्थितीत या दोघांनी ही आता लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.

मिळालेल्या वृत्तानुसार, रिया कपूर आणि करण बूलानी यांच्या लग्नाचे कार्यक्रम दोन-तीन दिवस चालणार आहेत. ज्यात काही मोजकेच लोक सहभागी होण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे हे लग्न एका खाजगी कार्यक्रमासारखा होणार आहे. रिया कपूर बॉयफ्रेंड करण बूलानीसोबत तिच्या जुहू बंगल्यावर सातजन्माची गाठ बांधणार आहे. ज्यात कुटुंब आणि मित्रांव्यतिरिक्त, फक्त काही मोजकेच लोक सहभागी होणार आहेत.

मात्र, अजूनही कपूर कुटुंबीयांनी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही किंवा कोणतेही निवेदन जारी करण्यात आलेले नाही.

याआधी रिया कपूर आणि करण बूलानी यांनी अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांवरील प्रेम व्यक्त केले आहे. बऱ्याचदा दोन्ही लव्ह बर्ड एकमेकांसोबतचे फोटो आपापल्या सोशल मीडिया हँडलवरून फोटो शेअर करताना दिसून आले आहेत. करण बूलानीने सोशल मीडियावर आपल्या आणि रियाबद्दलचे प्रेम स्पष्टपणे व्यक्त केले आहे. रिया ही निर्माता असण्याव्यतिरिक्त सध्या बहीण सोनम कपूरसह तिच्या ब्रॅण्ड रेसनवर काम देखील करत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-Shershaah: ‘आम्हाला माधुरी दीक्षित द्या आम्ही निघून जातो’; पाकिस्तानींच्या या मागणीवर विक्रम बत्रा यांनी दिले होते भन्नाट उत्तर

-भुज: द प्राईड ऑफ इंडिया: अजय देवगणला मोठा झटका, चित्रपट झाला ऑनलाईन लीक

-कोण आहेत शहिद कॅप्टन विक्रम बात्रांच्या प्रेयसी डिंपल, का आहेत आजही अविवाहीत?

हे देखील वाचा