मराठी टीव्ही इंडस्ट्रीमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे, तो म्हणजे सर्वांचा लाडका ‘राणा दा’. ‘चालतंय की’ असं म्हणत त्याने अवघ्या प्रेक्षकवर्गाच्या मनाचा ठाव घेतला. ‘तुझ्यात जीव रंगला’ या सुप्रसिद्ध मालिकेतून राणा दा अर्थातच हार्दिक जोशीने प्रचंड ओळख मिळवली. मालिकेत दाखवण्यात आलेला रांगडा पैलवान खऱ्या आयुष्यात मात्र तितकाच स्टायलिश आहे. त्यांचे मोस्ट स्टायलिश लूकमधील फोटो बऱ्याचदा इंटरनेटवर व्हायरल होताना दिसतात. अशातच त्याचा हटक्या लूकमधील एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
हा फोटो हार्दिकने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. यात तुम्ही पाहू शकता की त्याने हिरव्या रंगाचं शर्ट घातलं आहे, तर सोबतच पांढरं धोतर घातलं आहे. डोक्यावरच्या रंगीबेरंगी पगडीने अनेकांचं लक्ष वेधलं आहे. त्याने गळ्यात एक माळ घातलीये व हातातही एक माळ तुम्हाला पाहायला मिळेल. एकंदरीत या हटके लूकमध्ये हार्दिक बऱ्यापैकी देखणा दिसत आहे. (hardik joshi’s most stylish look goes viral on internet)
त्याचा हा लूक त्याच्या चाहत्यांना खास पसंत पडला आहे, हे आपल्याला या फोटोवर उमटणाऱ्या प्रतिक्रिया पाहून सहज लक्षात येईल. फोटोवर आतापर्यंत हजारो युजर्सने लाईक केलं आहे.
हार्दिकने ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेत मुख्य भूमिका साकारून प्रचंड लोकप्रियता मिळवली. आता अभिनेता लवकरच नव्या मालिकेसह चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या मालिकेतून हार्दिक टीव्हीवर पुनरागमन करत आहे. झी मराठीवर सुरू होणाऱ्या या मालिकेचे अनेक प्रोमो समोर आले आहे, जे पाहून प्रेक्षकांना या मालिकेबद्दल उत्सुकता लागली आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-