Sunday, February 23, 2025
Home साऊथ सिनेमा ‘कंचना ३’ फेम अभिनेत्रीचा गोव्यामध्ये संशयास्पद मृत्यू; परंतु ‘या’ कारणामुळे होत नाहीये पोस्टमॉर्टम

‘कंचना ३’ फेम अभिनेत्रीचा गोव्यामध्ये संशयास्पद मृत्यू; परंतु ‘या’ कारणामुळे होत नाहीये पोस्टमॉर्टम

हॉरर चित्रपट ‘कंचना ३’ यासह इतर अनेक चित्रपटांमध्ये काम केलेली अभिनेत्री अलेक्झांडर जावीचे शुक्रवारी (२० ऑगस्ट) उत्तर गोव्याच्या सिओलीम गावात निधन झाले. ती गोव्यात भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होती. ती राहत्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळली. अभिनेत्री अलेक्झांडरने आत्महत्या केली असावी, असा पोलिसांना संशय आहे. परंतु तपासकर्ते सध्या पोस्टमार्टम रिपोर्ट येण्याची वाट पाहत आहेत. खरं तर गोवा पोलीस अभिनेत्री अलेक्झांडर जावीच्या मृतदेहाच्या पोस्टमॉर्टमसाठी रशियन वाणिज्य दूतावासाच्या मंजुरीची वाट पाहत आहेत.

मृतदेह कोठे ठेवला आहे?
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले आहे की, अभिनेत्री अलेक्झांडर जावीचा मृतदेह शवघरात ठेवण्यात आला आहे आणि ते पोस्टमार्टमसाठी रशियन वाणिज्य दूतावासाकडून एनओसीची वाट पाहत आहोत. त्याचबरोबर ते पुढे म्हणाले की, पोलिसांनी या प्रकरणी आधीच तपास सुरू केला आहे आणि रशियन अभिनेत्री अलेक्झांडर जावीच्या प्रियकराचा जबाब देखील नोंदवण्यात आला आहे. (The suspicious death of actress Alexander Xavi has occurred, as it is still unclear)

प्रियकराचा नोंदवण्यात आला जबाब
अभिनेत्री अलेक्झांडर जावीचा प्रियकर त्याच अपार्टमेंटमध्ये अभिनेत्रीसोबत राहत होता. अलेक्झांडर जावीचा मृत्यू झाला, तेव्हा तो बाहेर गेला होता. दरम्यान, मुंबईतील रशियन वाणिज्य दूतावासातील गोव्याचे प्रतिनिधी, वकील विक्रम वर्मा यांनी पोलिसांना अभिनेत्री अलेक्झांडर जावीच्या मृत्यूमध्ये चेन्नईतील फोटोग्राफरची ‘संभावित भूमिकेची’ चौकशी करण्याची विनंती केली आहे.

फोटोग्राफर का आहे संशयित?
रशियन अभिनेत्रीने चेन्नईतील फोटोग्राफरवर २०१९ मध्ये लैंगिक छळाचा आरोप केला होता. त्यामुळे पोलिसांचा संशय फोटोग्राफरवर आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बिग बॉस ओटीटी’ फेम अक्षरा सिंगचं नवं गाणं आलं प्रेक्षकांच्या भेटीला; अल्पावधीतच मिळाले तब्बल ‘इतके’ व्ह्यूज

-एअरपोर्टवर कुटूंबासह स्पॉट झाली करीना, पाहायला मिळाला चिमुकल्या तैमुर अन् जेहचा गोंडस अंदाज

-भारीच ना! अक्षय कुमारच्या ‘बेल बॉटम’नंंतर आता कंगना रणौतचा ‘थलायवी’ देखील होणार चित्रपटगृहात प्रदर्शित

हे देखील वाचा