Saturday, March 21, 2026
Home बॉलीवूड ‘मिस डोंबिवली’ असलेल्या डेजीने बॅकग्राऊंड डान्सरपासून सुरू केला तिचा प्रवास, आज आहे बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री

‘मिस डोंबिवली’ असलेल्या डेजीने बॅकग्राऊंड डान्सरपासून सुरू केला तिचा प्रवास, आज आहे बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री

आज मनोरंजन क्षेत्राची खूप मोठी व्याप्ती आहे. अनेक लोकांना इथे मिळणारी प्रसिद्धी, लोकप्रियता, पैसे यांची भुरळ पडते आणि ते या क्षेत्रात येण्यासाठी प्रयत्न करतात. मात्र इथे येणे आणि यश मिळवणे अजिबात सोपे नाही. प्रयत्नांना नक्कीच नशिबाची साथ आवश्यक आहे. अनेकदा तर प्रतिभा असलेल्या लोकांना देखील इथे काम मिळत नाही, तर येड्यागबाळ्याचे काय होईल हे सर्वच समजू शकता. मात्र चिकाटी, मेहनत यांच्या जोरावर माणूस कुठून कुठे जाऊ शकतो याची असंख्य उदाहरणं बॉलिवूडमध्ये आहे. शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या या कलाकारांच्या यादीतील एक नाव म्हणजे अभिनेत्री डेजी शहा. आज डेजी शहा तिचा ३७ वा वाढदिवस साजरा करत आहे त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्याबद्दल अधिक माहिती.

डेजी शहाचा जन्म २५ ऑगस्ट १९८३ साली मुंबईमध्ये एका गुजराती परिवारात झाला. तिचे वडील डोंबिवलीमध्ये एका कापड गिरणीत काम करायचे तर आई गृहिणी होती. डेजीने १० वी मध्ये असताना डोंबिवलीच्या एका सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला. या स्पर्धेत ती ‘मिस डोंबिवली’ म्हणून निवडली गेली. तिने खूपच कमी वयात मॉडेलिंग करायला सुरुवात केली. डान्समध्ये तिला सुरुवातीपासूनच रस असल्याने तिने गणेश आचार्य यांच्याकडून डान्सचे प्रशिक्षण घेतले आणि त्याच्यासोबत जवळपास तीन वर्ष असिस्टंट म्हणून काम केले. यादरम्यानच ती ‘रहना है तेरे दिल में’ आणि ‘तेरे नाम’ या चित्रपटांमध्ये बॅकग्राउंड डान्सर म्हणून दिसली. तेरे नाम चित्रपटातील ‘ओ जाना’, ‘लगन लगी’ या गाण्यांमध्ये ती सलमानच्या मागे नाचताना आजही दिसते. ‘हमको दीवाना कर गए’ या सिनेमात देखील डेजी दिसली.

डान्ससोबतच डेजी मॉडलिंगदेखील करत होती. तिने अनेक फोटोशूट आणि प्रिंटशूट देखील केले होते. यातच एका कन्नड दिग्दर्शकाची तिच्यावर नजर पडली आणि त्याने तिला त्याच्या ‘चिंगारी’ सिनेमाची ऑफर दिली. मात्र २०११ साली डेजीने कन्नड सिनेमा ‘बॉडीगार्ड’मधून अभिनयात पदार्पण केले. तिला ‘भद्रा’सिनेमामुळे मोठी प्रसिद्धी मिळाली. यासोबतच ती अनेक चित्रपटांमध्ये आणि गाण्यांमध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसली.

यातच डेजीचे नशीब फळफळे, तिच्यावर सलमान खानची नजर पडली, आणि ती थेट ‘जय हो’ सिनेमात सलमानची नायिका म्हणून दिसली. या सिनेमाने तिला प्रचंड प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळवून दिली. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर १९५ कोटींचा बक्कळ पैसा कमवला. यानंतर ती ‘हेट स्टोरी ३’, ‘रेस ३’ मात्र हे सिनेमे काही खास कमल दाखवू शकले नाही. असे असूनही आज डेजी इंडस्ट्रीमध्ये यशस्वी आहे. तिच्याकडे प्रसिद्धी, लोकप्रियता आणि पैसा आहेत. डेजीने २०१९ साली ‘११’ या सिनेमातून गुजराती इंडस्ट्रीमध्ये देखील पदार्पण केले.

एका रिपोर्टनुसार डेजीकडे १८५ कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे सांगितले जाते. तिने हा पैसा मॉडेलिंग, जाहिराती आणि चित्रपटांमधून कमावला आहे. तिच्याकडे मुंबईमध्ये एक 3BHK चा आलिशान फ्लॅट असून, सोबतच ७० लाखांची रेंज रोवर आणि ९० लाखांची मर्सिडीज बेंज या दोन गाड्या देखील आहेत.

 

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अपारशक्ती खुराणा लवकरच होणार बाबा, शेअर केला पत्नीच्या डोहाळे जेवणाचा सुंदर व्हिडिओ

-‘तुम्ही मला टक लावून पाहत होता पण…’, म्हणत प्रिया बापटकडून फोटो शेअर

-बोल्ड आणि डॅशिंग! ‘दिलबर गर्ल’ नोरा फतेहीचा नवीन लूक आला समोर

हे देखील वाचा