मराठी चित्रपटसृष्टीतील अत्यंत सोज्वळ, सुंदर, निरागस आणि आपल्या अभिनयाच्या जोरावर आख्ख्या महाराष्ट्राला वेड लावणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान. अनेक मालिकांमधून तसेच चित्रपटातून ती घराघरात पोहचली आहे. उत्तम संवाद कौशल, योग्य टायमिंग, प्रत्येक भावना प्रेक्षकांपर्यंत पोहचवणे ही तेजश्रीची ओळख आहे. ऑनस्क्रीन प्रमाणेच ऑफस्क्रीन देखील तेजश्री एक प्रेमळ व्यक्तिमत्व आहे. या गोष्टीची खात्री तिच्या सोशल मीडिया पोस्टवरून पटते. तेजश्रीने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे.
तेजश्रीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तेजश्रीने निळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. तिने जास्त मेकअप केलेला नाही, तसेच कोणतीही ज्वेलरी परिधान केली नाही, तरी देखील या लूकमध्ये ती अत्यंत सुंदर दिसत आहे. तिने केवळ कानात पिवळ्या रंगाचे इअरिंग घातले आहेत. तिचा हा फोटो खूप व्हायरल होत आहे.
तेजश्रीने शेअर केलेल्या या फोटोवर तिच्या चाहत्यांसोबत अनेक कलाकार देखील कमेंट करत आहेत. तिच्या या फोटोवर श्रेया बुगडे हिने “यू ब्युटी” अशी कमेंट केली आहे. तसेच सोनाली खरे हिने “सो क्यूट” अशी कमेंट केली आहे. सोबत तिचे अनेक चाहते फोटोवर कमेंट करत आहेत. तिचा या फोटोला आतापर्यंत ३५ हजारापेक्षाही जास्त लाईक्स मिळाले आहेत. (marathi actress tejshri pradhan share her photos on social media)
तेजश्रीने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. पण तिची होणार ‘सून मी या घरची’ ही मालिका संपूर्ण महाराष्ट्रात खूप गाजली होती. या मालिकेतील तिच्या जान्हवी नावाच्या पात्राला खूप पसंती मिळाली होती. तसेच तिची ‘अगंबाई सासूबाई’ ही मालिका देखील खूप लोकप्रिय झाली होती. या मालिकेतील तिचे शुभ्रा नावाचे अत्यंत समंजस, विचारी आणि प्रॅक्टिकल पात्र प्रेक्षकांना खास पसंत पडले होते. याशिवाय तिने ‘लेक लाडकी या घरची’, ‘या गोजिरवाण्या घरात’ या मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच तिने ‘ती सध्या काय करते’, ‘असेही एकदा व्हावे’, ‘लग्न पहावे करून’, ‘झेंडा’, ‘शर्यत’, ‘डॉक्टर प्रकाश बाबा आमटे’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-अभिनयात येण्यापूर्वी ‘हे’ काम करायची श्रुती हासन; म्हणाली, ‘कोणालाही माहित नव्हते की…’
-Bigg Boss OTT: लाजून लाल झाली शमिता, जेव्हा करणने ‘हॉटनेस’वर प्रश्न विचारताच राकेश म्हणाला…
-‘टायगर ३’साठी कॅटरिना कैफ रशियाला रवाना; स्टंट सीन शूट करण्यासाठी घेतीये प्रचंड मेहनत