Friday, March 29, 2024

Bigg Boss OTT: लाजून लाल झाली शमिता, जेव्हा करणने ‘हॉटनेस’वर प्रश्न विचारताच राकेश म्हणाला…

‘बिग बॉस ओटीटी’ शोमध्ये रविवारी ‘संडे का वाॅर’ भाग दाखवण्यात आला. दरवेळी प्रमाणे, करण जोहर स्पर्धकांकडून एका आठवड्याचा हिशोब घेताना दिसला. त्याचवेळी ‘संडे का वॉर’ राकेश बापट आणि शमिता शेट्टीसाठी खास ठरला. शमिताने शोमध्ये राकेशची स्तुती करत क्यूट म्हटले होते, यामुळे करण जोहर त्याची मज्जा घेताना दिसला. या व्यतिरिक्त, शमिताने केलेल्या किसच्या मागणीवर करण तिलाही छेडताना दिसला आहे.

शोमध्ये शमिताने तिच्या ‘शरारा शरारा’ या गाण्याच्या स्टेप्स राकेश बापटला शिकवल्या आणि तिने राकेशची स्तुतीही केली. करणने राकेशला शमिताबद्दल काही प्रश्न विचारले. या वेळी राकेश म्हणाला, “मला वाटते की, शमिता खूप सुंदर, खूप हॅट, खूप काळजी घेणारी आणि एक कमालची व्यक्ती आहे. ती एक परफेक्ट पॅकेज आहे.” जेव्हा करणने राकेशला शमिताच्या ‘हॉटनेस’वर कमेंट्स करण्यास सांगितले, तेव्हा तो म्हणाला, “सर, शमिता खूप हॉट आहे.” हे ऐकताच शमिता लाजली आणि म्हणाली की, “करण हे खूपच विचित्र आहे.”

दरम्यान, राकेश आणि शमिताविषयी सगळीकडेच चर्चा सूरू आहे. ‘बिग बाॅस’च्या घरात आणि घराबाहेरही हे कनेक्शन चर्चेत आहे. याआधी हे दोघेही रोमँटिक डेटवर गेले होते. या दरम्यान राकेश शमिताच्या पायाची मालिश करताना दिसला. राकेश एवढ्यावरच थांबला नाही, त्याने शमिताच्या खांद्याची आणि पाठीचीही मसाज करून दिली. हा टास्क कपलच्या डान्ससोबत संपला. इथेही शमिता आणि राकेशने आपल्या अभिनयाच्या जोरावर चाहत्यांना वेड लावले. त्यानी ‘इश्क वाला लव’ या रोमँटिक गाण्यावर डान्स करून प्रेक्षकांचे मन जिंकले.

प्रेक्षकांना शमिता शेट्टी आणि राकेश बापट यांची केमिस्ट्री खूप आवडत आहे. एकदा शमिता ‘बिग बॉस’च्या घरात रडताना दिसली, तेव्हा राकेशने तिला प्रेमाने मिठी मारली आणि शांत केले. दोघेही शोमध्ये एकमेकांना सपोर्ट करताना दिसत आहेत. त्यामुळे चाहत्यांना शमिता आणि राकेशला एकत्र पाहायला खूप आवडते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मी स्वत:ला स्टारकिड मानत नाही’; अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीचे मोठे वक्तव्य

-‘इंडियन आयडल १२’च्या ग्रँड फिनालेने टेलिव्हिजन विश्वात नोंदवला ‘हा’ खास विक्रम; टीमने आनंद साजरा केला

-‘बिग बीं’च्या सुरक्षेत तैनात हेड कॉन्स्टेबलची झाली बदली; पगाराची माहिती मिळताच बॉडीगार्डविरुद्ध विभागीय चौकशीचे आदेश

हे देखील वाचा