प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने गुरुवारी (२ सप्टेंबर) या जगाचा निरोप घेतला आहे. तो अवघ्या ४० वर्षांचा होता. त्याचे निधन हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगितले जात आहे. त्याच्या निधनाने प्रत्येकाला हैराण केले आहे. हृदय विकाराच्या झटक्यानंतर गुरुवारी त्याने मुंबईमधील कूपर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. अशामध्ये सिद्धार्थची शेवटची इंस्टाग्राम पोस्ट जोरदार व्हायरल होत आहे.
सिद्धार्थने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून २४ ऑगस्ट रोजी आपला एक फोटो शेअर केला होता. यामध्ये त्याने फ्रंटलाईन वर्कर्सला धन्यवाद दिला होता. सिद्धार्थने हा फोटो शेअर करत लिहिले होते की, “सर्व फ्रंटलाईन वर्कर्सला मनापासून धन्यवाद! तुम्ही तुमचा जीव धोक्यात टाकता, असंख्य तास काम करता आणि त्या आजारी व्यक्तींना विश्रांती देता, जे आपल्या कुटुंबासोबत असतात. तुम्ही वास्तवात सर्वात शूरवीर आहात. आघाडीवर असणे सोपे नाही, मात्र, आम्ही वास्तवात आपल्या प्रयत्नांचे कौतुक करतो. #MumbaiDiariesOnPrime या सुपरहिरोंसाठी पांढरी टोपी, नर्सिंग स्टाफ आणि त्यांच्या असंख्य बलिदानासाठी एक श्रद्धांजली आहे. २५ ऑगस्टला ट्रेलर प्रदर्शित होईल. #TheHeroesWeOwe.”
सिद्धार्थने छोट्या पडद्यावरील मालिका ‘बालिका वधू’मधून तुफान प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. तो ‘दिल से दिल तक’ या मालिकेतही झळकला होता. (Sidharth Shukla Last Instagram Post Before Death Thanks These People)
याव्यतिरिक्त सिद्धार्थ ‘फियर फॅक्टर- खतरों के खिलाडी’च्या सातव्या पर्वातही झळकला होता. त्याने ‘सावधान इंडिया’ आणि ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ शोदेखील होस्ट केला होता. टीव्हीवरील सर्वात प्रसिद्ध आणि वादग्रस्त शो असलेल्या ‘बिग बॉस १३’मध्ये त्याने विजेतेपद पटकावले होते. तसेच त्यातून त्याला कमालीची प्रसिद्धी मिळाली. यादरम्यानच त्याची आणि पंजाबी अभिनेत्री शहनाज गिलची जोडी चांगली पसंत करण्यात आली. दोघेही नुकतेच ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये दिसले होते.
सिद्धार्थने सन २००८ मध्ये ‘बाबुल का अंगना छूटे ना’ मालिकेतून कारकिर्दीची सुरुवात केली होती. सिद्धार्थचा जन्म १२ डिसेंबर, १९८० मध्ये मुंबईच्या हिंदू ब्राह्मण कुटुंबात झाला होता. त्याने आपल्या मॉडेलिंगच्या दिवसातच वडिलांना गमावले होते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-जाळ अन् धूर संगटच! राखी सावंतने ‘कमरिया लचके रे’ गाण्यावर लावले ठुमके; व्हिडिओ जोरदार व्हायरल
-‘पवित्र रिश्ता २.०’चा ट्रेलर चाहत्यांच्या भेटीला; चाहते म्हणाले, ‘सुशांतशिवाय सर्वकाही अपूर्ण’
-सई ताम्हणकरचा समुद्रात जलवा; चाहते तर सोडाच, कलाकारांनीही पाडला कमेंट्सचा पाऊस