जाळ अन् धूर संगटच! राखी सावंतने ‘कमरिया लचके रे’ गाण्यावर लावले ठुमके; व्हिडिओ जोरदार व्हायरल

बॉलिवूडची ‘ड्रामा क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी डान्सर- अभिनेत्री राखी सावंत तिच्या नवीन व्हिडिओमुळे आणखी एकदा चर्चेत आली आहे. या व्हिडिओमध्ये राखी सावंत बोल्ड स्टाईलमध्ये डान्स करताना दिसत आहे. ती तिच्या एका साथीदारासोबत ‘कमरिया लचके रे’ या गाण्यावर जोरदार ठुमके लावत आहे. राखीचा हा डान्स व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये असे दिसत आहे की, राखी सावंत या परफॉर्मन्स दरम्यान अनेक खतरनाक डान्स मूव्हज करत आहे. एवढेच नाही, तर व्हिडिओमधील कॅमेरा अशा ठिकाणी झूम केलेला पाहून लोकांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. राखी सावंतचा हा डान्स व्हिडिओ पाहून एका युजरने कमेंट बॉक्समध्ये लिहिले की, “राखी सावंत नोरा फतेही का बनत आहे.” दुसऱ्या युजरने लिहिले की, “त्याला कमरिया म्हटले जात नाही.”

View this post on Instagram

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)

बोल्ड अदाकारीसाठी झाली ट्रोल
त्याचबरोबर कमेंट सेक्शनमध्येही अनेकांनी राखी सावंतला फटकारले आहे. राखी सावंतच्या व्हिडिओवर अनेक युजर्सनी हसणारे इमोजी तयार केले आहेत. हा व्हिडिओ आतापर्यंत १ लाखापेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे. मात्र, राखी सावंतच्या या व्हिडिओवर जसलीन मथारूने एक स्तुतीपर प्रतिक्रिया केली आहे आणि तिला हॉट म्हटले आहे.

जसलीन मथारू यांनी स्तुती केली
अभिनेत्री राखी सावंत आणि जसलीन मथारू या दोघेही बिग बॉसचा भाग राहिल्या आहेत. राखी सावंत ‘बिग बॉस १४’ मध्ये दिसली होती, तर जसलीन मथारू भजन सम्राट अनुप जलोटासोबत बिग बॉसच्या घरात गेली होती. बिग बॉसच्या घरात दोन्ही स्पर्धकांच्या आगमनानंतर शोचा टीआरपी खूप वाढला होता. राखीने आपल्या अभिनयाने नेहमीच चाहत्यांचे मनोरंजन केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘पवित्र रिश्ता २.०’चा ट्रेलर चाहत्यांच्या भेटीला; चाहते म्हणाले, ‘सुशांतशिवाय सर्वकाही अपूर्ण’

-सई ताम्हणकरचा समुद्रात जलवा; चाहते तर सोडाच, कलाकारांनीही पाडला कमेंट्सचा पाऊस

-‘नुसती क्यूट आहेस तू’, म्हणत वीणा जगतापच्या फोटोवर चाहत्याने केली लक्षवेधी कमेंट

Latest Post