Saturday, April 19, 2025
Home बॉलीवूड Siddharth Shukla Birth Anniversary| जगभरातील मॉडेल्सला हरवून सिद्धार्थ शुक्ला ठरला होता ‘वर्ल्ड्स बेस्ट मॉडेल’ स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय

Siddharth Shukla Birth Anniversary| जगभरातील मॉडेल्सला हरवून सिद्धार्थ शुक्ला ठरला होता ‘वर्ल्ड्स बेस्ट मॉडेल’ स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय

Siddharth Shukla Birth Anniversary | अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचे (2 सप्टेंबर) सकाळी अचानक निधन झाले. सिद्धार्थचे कुटुंब मूळचे उत्तर प्रदेशातील प्रयागराजचे असून, त्याचे वडील रिझर्व्ह बँकेत नोकरीच्या संदर्भात मुंबईत स्थायिक झाले होते. सिद्धार्थ पहिल्यांदा 2005 मध्ये प्रेक्षकांच्या नजरेसमोर आला. तेव्हा त्याने तुर्कीमध्ये जगभरातील मॉडेल्सला हरवून ‘वर्ल्ड्स बेस्ट मॉडेल’ ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकली होती. ही स्पर्धा जिंकणारा सिद्धार्थ पहिला भारतीय ठरला होता. 

टेलिव्हिजनमध्ये 2008 पासून काम करणारा सिद्धार्थ ‘बिग बॉस 13’ या रियॅलिटी शोचा विजेता ठरला. त्यापूर्वी तो ‘खतरों के खिलाडी’च्या सातव्या हंगामाचा विजेताही ठरला होता. करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनच्या ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’ चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सिद्धार्थ शुक्लाला सुरुवातीपासूनच फिटनेसची आवड होती आणि तो त्यासाठी सतत मेहनत करायचा.

मिळालेल्या माहितीनुसार, १ सप्टेंबर बुधवारी रोजी रात्री त्याने औषध घेतले आणि त्यानंतर तो झोपला तो सकाळी उठलाच नाही. कुटुंबातील सदस्यांनी त्याला कूपर हॉस्पिटलमध्ये नेले जेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सिद्धार्थच्या पश्चात आई आणि दोन बहिणी आणि मेहुणे आहेत. सिद्धार्थ मॉडेलिंगमध्ये करियर सुरू करत असताना सिद्धार्थचे वडील अशोक शुक्ला यांचे निधन झाले.

टेलिव्हिजनवर सिद्धार्थ शुक्ला बराच काळ काम करत राहिला आणि टेलिव्हिजन सीरियल ‘बालिका वधू’ने त्याचे नाव घराघरात पोहोचवले. पण ‘बिग बॉस’च्या तेराव्या सीझनने त्याला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. सर्व मीडिया हाऊसने त्यावेळच्या सर्वात लोकप्रिय ‘बिग बॉस’ कलाकाराबद्दल सर्वेक्षण केले होते आणि सिद्धार्थ शुक्लाला प्रत्येक सर्वेक्षणात सर्वाधिक मते मिळाली होती.

बिग बॉसने त्याच्या लोकप्रियतेत अधिकाधिक भर घालत त्याला तुफान लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवून दिली. सिद्धार्थने कधीही स्वतःला एका माध्यमापुरता मर्यादित न ठेवता सर्वच क्षेत्रात आजमावून पाहिले. ‘ब्रोकन बट ब्युटीफुल 3’ या त्याच्या सिरिजला देखील प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद मिळाला. (sidharth shukla was first indian who won worlds best model competition)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही नक्की वाचा-
सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर स्वतःला नॉर्मल ठेवण्यासाठी शेहनाज करते ‘हा’ उपाय, स्वतःच केला खुलासा

बापरे! तब्बल ‘इतक्या’ कोटींची संपत्ती मागे सोडून गेला सिद्धार्थ शुक्ला; आकडा तर वाचाच

हे देखील वाचा