Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘सिद्धार्थ रात्रीपर्यंत पूर्णपणे ठीक होता, पण सकाळी…’, अभिनेत्याच्या मृत्यूवर आईची मोठी प्रतिक्रिया

टीव्ही अभिनेता सिद्धार्थ शुक्ला आता आपल्यात नाही. गुरुवारी (२सप्टेंबर) सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. कूपर हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी सिद्धार्थची तपासणी केली आणि १०:३० च्या सुमारास त्याला मृत घोषित केले. सिद्धार्थच्या मृतदेहावर शवविच्छेदन प्रकिया कूपर हॉस्पिटलमध्ये झाली. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर सिद्धार्थच्या मृत्यूमागील खरे कारण काय हे स्पष्ट होईल. दुसरीकडे, पोलीस या प्रकरणी सर्व जवळच्या लोकांची चौकशी करत आहे.

यातच सिद्धार्थच्या आईने तिच्या मुलाला गमावल्यानंतर पोलिसांकडे त्यांचा जबाब नोंदवला आहे. सिद्धार्थच्या आईने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, “सिद्धार्थ रात्रीपर्यंत पूर्णपणे ठीक होता. रात्रीच्या जेवणानंतर तो झोपायला गेला, पण सकाळी तो उठलाच नाही. यापूर्वी सिध्दार्थच्या कुटुंबियांनी स्पष्ट केले होते की, सिद्धार्थ कोणत्याही मानसिक दबावाखाली नव्हता.”

माध्यमातील वृत्तानुसार, रात्री काही औषधे घेतल्यानंतर सिद्धार्थ झोपला आणि सकाळी जेव्हा त्याच्या आईने दरवाजा ठोठावला तेव्हा आतून काहीच उत्तर आले नाही. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले आणि रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. कुटुंबातील व्यक्तींने सांगितले आहे की, सिद्धार्थ कोणत्याही मानसिक दबावाखाली नव्हता.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या संपूर्ण घटनेत कोणतीही चुकीचा किंवा संशयास्पद गोष्ट समोर आली नाही. बीएमसी आरोग्य विभागाची टीम देखील कूपर हॉस्पिटलमध्ये पोहोचली आणि या प्रकरणी कूपर हॉस्पिटलच्या टिमकडून संपूर्ण माहिती घेतली. कूपर हॉस्पिटलच्या टिमने सांगितले, जेव्हा सिद्धार्थला हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले, तेव्हा हॉस्पिटलमध्ये येण्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता.

पोलिस मृतदेहाचा पंचनामा केला असून, त्याचे शवविच्छेदन आदी सर्व वैद्यकीय प्रक्रियेअंतर्गत केले आहे. कूपर हॉस्पिटलचे डॉक्टर शिवकुमार आणि यांनी सिद्धार्थचे पोस्टमार्टम केले आहे. दरम्यान, सिद्धार्थचे अनेक सहकारी स्टार्स आणि ‘बिग बॉस १३’चे स्पर्धक सिद्धार्थच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी पोहोचत आहेत. बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव त्याची गर्लफ्रेंड पत्रलेखासोबत त्याच्या घरी पोहोचला आहे.

टीव्ही मालिका ‘बालिका वधू’मुळे सिद्धार्थ शुक्ला सुपरहिट झाला. यासोबतच तो अनेक मालिकांमध्ये दिसला. सिद्धार्थ ‘बिग बॉस १३’ चा विजेता ठरला. सिद्धार्थ शुक्लाचा जन्म १२ डिसेंबर १९८० रोजी झाला. त्याने इंटिरियर डिझायनिंगमध्ये पदवी घेतली. नंतर RBI मध्ये सिव्हिल इंजिनिअरची नोकरीही केली. २००५ मध्ये त्याने ‘वर्ल्ड बेस्ट’ मॉडेल स्पर्धेत भाग घेतला. ही स्पर्धा तुर्कीमध्ये आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत अमेरिका आणि युरोपमधून लोक आले होते.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

बापरे! तब्बल ‘इतक्या’ कोटींची संपत्ती मागे सोडून गेला सिद्धार्थ शुक्ला; आकडा तर वाचाच

-बहीण आणि मेहुण्याने बेशुद्ध अवस्थेत सिद्धार्थला नेले होते रुग्णालयात; वाचा कोण आहे त्याच्या कुटुंबात

‘बिग बाॅस’ फेम सिद्धार्थ शुक्लाची काय होती शेवटची सोशल मीडिया पोस्ट?

हे देखील वाचा