बॉलिवूडचा ‘मिस्टर पर्फेक्शनिस्ट’ आमिर खानचा भाऊ फैजल खानही लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. त्याच्या ‘फॅक्टरी’ या कमबॅक चित्रपटाद्वारे तो दिग्दर्शनाच्या जगात पाऊल टाकणार आहे. आजकाल, त्याच्या चित्रपटाव्यतिरिक्त, फैजल खान देखील त्याच्या वक्तव्यासाठी चर्चेत आहे. सध्या फैजल हा आमिर खान आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांविषयी मीडियामध्ये बोलत असतो. अलीकडेच फैजलने पुन्हा एकदा आमिरबद्दल विधान केले आहे.
माध्यमांतील वृत्तानुसार, फैजल खानने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या आयुष्यातील अनेक चढ-उतारांविषयी सांगितले. फैजलने आमिर खानसोबतच्या त्याच्या नात्याबद्दलही सांगितले. तो म्हणाला की, “मी माझे करिअर घडवण्यासाठी आमिरकडे कधीही मदत मागितली नाही. मला माझ्या स्वतःच्या गोष्टी करायच्या होत्या. कारण माझे यश किंवा अपयश काहीही असले, तरीही ते माझे आहे. तो माझा भाऊ आहे, त्याला माझे चांगले व्हावे वाटत आहे, पण मला एका वाईट टप्प्यातून जावे लागले जे माझ्या प्रवासाचा भाग आहे.”
फैजल खान पुढे म्हणाला की, “मी ईदच्या दिवशी आपल्या कुटुंबातील सदस्यांशी फोनवर बोलतो, त्यांना शुभेच्छा देतो, पण मला त्यांच्यापासून अंतर ठेवायचे आहे.” तो कुटुंबावर आरोप करत पुढे म्हणाला की, ‘एकदा मी गंभीर आजारातून जात होतो. त्या काळात माझ्या कुटुंबीयांनी मला वर्षभर घरात कैद केले होते.”
त्या घटनेची आठवण करून देताना फैजल सांगतो की, “त्यादरम्यान मला आमिरचा फोन आला. मी कागदावर सही करावी अशी आमिरची इच्छा होती. ज्यामध्ये लिहिले होते की, मी वेडा आहे आणि स्वतःची काळजी घेऊ शकत नाही. तेव्हापासून मी घर सोडून गेलो होताो.”
फैजल म्हणाला की, “मी आमिरला माफ केले आहे, पण घडलेल्या गोष्टी मी कधीही विसरू शकत नाही.”
आमिर खानने आपला भाऊ फैजल खानला ‘मेला’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये लाँच केले होते. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पूर्णपणे फ्लॉप ठरला. फैजलने काही वर्षे आमिरच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये स्क्रिप्ट रायटर म्हणूनही काम केले आहे, पण नंतर या भावांच्या नात्यात दुरावा आला आणि फैजलने आमिरवर अनेक आरोप लावले. परंतु आता हे दोन्ही भाऊ आपापल्या मार्गावर आहेत.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-प्रसिद्ध दिग्दर्शकाने बॉलिवूडचं काळं सत्य आणलं बाहेर; म्हणाले, ‘इथं एवढं जोरात मारलं जातं की…’
-कोणासोबत राहतात अभिनेते दिलीप प्रभावळकर? जाणून घ्या ‘पछाडलेला’मधील इनामदार भुसनाळेच्या कुटूंबाबद्दल