सिद्धार्थच्या मृत्यूनंतर चाहते आणि कलाकार त्याच्याशी संबंधित आठवणी शेअर करत आहेत. दरम्यान, सिद्धार्थचे एक जुने ट्वीट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सिद्धार्थने हे ट्वीट ऑक्टोबर २०१७ मध्ये केले होते. या ट्वीटमध्ये सिद्धार्थने लिहिले होते की, “मृत्यू हे आयुष्यातील सर्वात मोठे नुकसान नाही. सर्वात मोठे नुकसान म्हणजे आपण जिवंत असताना आपल्या आत जे मरत असत ते आहे.”
चाहते भावनिक झाले
सिद्धार्थच्या या जुन्या ट्वीटने चाहत्यांना भावुक केले आहे. सोशल मीडिया युजर्स २०१७ च्या या ट्वीटवर कमेंट करून आपले दुःख व्यक्त करत आहेत. एका चाहत्याने कमेंट केली आणि लिहिले की, “नाही भावा, तू या ठिकाणी चुकीचा आहेस, मृत्यू हे जीवनातील सर्वात मोठे नुकसान आहे. तू या जगात नाहीयेस यावर विश्वास बसत नाही.” त्याचवेळी, दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले की, “खरोखर, आज माझ्या आतला एक भाग मरण पावला आहे आणि आता तो कधीही पहिल्यासारखा होणार नाही.”
Death is not the greatest loss in life .The greatest loss is what dies inside of us while we live…..
— Sidharth Shukla (@sidharth_shukla) October 24, 2017
सिद्धार्थचे अभिनयात पदार्पण
सिद्धार्थ शुक्लाने २००८ मध्ये सोनी टीव्हीच्या ‘बाबुल का आंगन छुटे ना’ या चित्रपटातून टीव्हीवर पदार्पण केले. सिद्धार्थने शोमध्ये शुभ राणावतची भूमिका साकारली होती. फेब्रुवारी २००९ मध्ये हा शो संपला. यानंतर, सिद्धार्थ शुक्ला २००९ मध्येच टीव्ही शो ‘जाने पेहचाने से… ये अजनबी’ मध्ये दिसला. या शोमध्ये सिद्धार्थने वीरची भूमिका साकारली होती. या शोनंतर, सिद्धार्थ हॉरर शोच्या काही भागांमध्ये देखील दिसला होता.
‘बिग बॉस १३’ आणि ‘ब्रोकन बट ब्यूटीफुल ३’ ने जिंकली मने
सिद्धार्थ शुक्ला बिग बॉसच्या १३ व्या सीझनमध्ये दिसला होता. सिद्धार्थने केवळ प्रेक्षकांची मने जिंकली नव्हती, तर शोचे शीर्षक देखील जिंकले होते. ‘बिग बॉस १३’मध्ये शहनाज गिलसोबत सिद्धार्थची केमिस्ट्री चांगलीच चर्चेत आली होती. सोशल मीडियावर आताही ‘सिडनाज’ ट्रेंडिंगवर आहे. सिद्धार्थ शेवटचा ‘ब्रोकन बट ब्यूटीफुल ३’ मध्ये दिसला होता. या शोला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…










