‘मी माझा मुलगा गमावला आहे’, सिद्धार्थच्या निधनावर प्रत्युषाच्या वडिलांनाही भावना अनावर

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाची सर्वात जास्त गाजलेली मालिका ‘बालिका वधू’ ही होती. या मालिकेत प्रत्युषा बॅनर्जी आणि सिद्धार्थ शुक्ला यांची जोडी खूप गाजली होती. प्रत्युषा आणि सिद्धार्थ दोघे ही ‘बिग बॉस ७’ मध्ये सहभागी झाले आहेत. दुर्दैवाने, टीव्ही इंडस्ट्रीचे हे दोन्ही कलाकार आता आपल्यात नाहीत. सिद्धार्थ शुक्लाचे २ सप्टेंबर २०२१ रोजी निधन झाले. अशा परिस्थितीत प्रत्युषाच्या वडिलांनी सिद्धार्थबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे.

‘मी माझा मुलगा गमावला आहे’
प्रत्युषाच्या आत्महत्येनंतर सिद्धार्थ तिच्या कुटुंबाच्या सतत संपर्कात होता. प्रत्युषाच्या वडिलांनी एका माध्यमाला सांगितले की, सिद्धार्थची बातमी ऐकून त्यांना धक्का बसला आहे. शंकर बॅनर्जी पुढे म्हणाले की, “हे कसे काय घडले हे मला समजत नाही. मी सिद्धार्थला माझ्या मुलासारखे मानले होते. बालिका वधूच्या दिवसांमध्ये प्रत्युषा आणि सिद्धार्थ यांची ऑफस्क्रीनही खूप मैत्री होती. सिद्धार्थ आमच्याकडे अनेकदा यायचा.” (“I have lost my son”, Pratyusha’s father was shocked by Siddhartha’s departure)

लॉकडाऊनमध्येही सिद्धार्थ करायचा मदत
शंकर पुढे म्हणाले की, “प्रत्युषाच्या मृत्यूनंतर बऱ्याच लोकांनी सिद्धार्थ आणि माझ्या मुलीच्या नात्याबद्दल बोलले होते. यामुळे सिद्धार्थने घरी येणे देखील बंद केले होते. तो मला अनेकदा व्हॉट्सऍपवर मेसेज करून विचारपूस करायचा.” शंकर पुढे म्हणतात, “या लॉकडाऊनच्या वेळी त्याचे मेसेज सतत येत होते. त्याचा शेवटचा मेसेज एक – दोन महिन्यांपूर्वी आला होता. ‘काका-काकू काही मदतीची गरज आहे का? तुम्ही लोक ठीक आहात ना? मी तुम्हाला काही मदत करू?’ तो फक्त या गोष्टी बोलायचा. त्याने आम्हाला जबरदस्तीने वीस हजार पाठवले होते. मी देवाला फक्त ही प्रार्थना करतो की, तो जिथे कुठे असेल तिथे तो आनंदाने राहो. या दुःखाच्या वेळी त्याच्या कुटुंबातील सदस्यांना शक्ती द्या. मी माझा मुलगा गमावला आहे.”

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाने संपूर्ण देशाला धक्का बसला आहे. प्रत्येक व्यक्तीकडून सिद्धार्थला श्रद्धांजली वाहिली जात आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सिद्धार्थच्या निधनाने एक्स गर्लफ्रेंड शेफाली भावुक; म्हणाली, ‘विश्वास ठेवणे खूपच कठीण’

-सिद्धार्थ शुक्लाप्रमाणेच ‘या’ लोकप्रिय कलाकारांनी देखील घेतला कमी वयात याजगाचा निरोप, जाणून घ्या त्यांची नावे

-‘बिग बाॅस’ फेम सिद्धार्थ शुक्लाची काय होती शेवटची सोशल मीडिया पोस्ट?

Latest Post