Wednesday, April 17, 2024

‘सिडनाझ’च्या नात्याबद्दल सिद्धार्थचा मित्र अबू मलिकने केला मोठा खुलासा, म्हणाला…

प्रसिद्ध टीव्ही अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने गुरुवारी सकाळी (२ सप्टेंबर) जगाचा निरोप घेतला. सिद्धार्थचे वय अवघे ४० वर्ष होते. सिद्धार्थचे गुरुवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. सिद्धार्थच्या आकस्मिक निधनामुळे त्याच्या कुटुंबीयांसह चाहत्यांना आणि त्याच्या मित्र – मैत्रिणीना ही खूप मोठा धक्का बसला आहे. सिद्धार्थच्या मृत्यूने सर्वचजण खचले आहेत. इतकेच नव्हे तर सिद्धार्थची कथित मैत्रीण शहनाज गिल अजूनही शॉकमध्ये आहे आणि स्वतःला सांभाळू शकत नाहीये.

शहनाजच्या वडिलांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, शहनाज खूप रडत आहे. शहनाज वडिलांना म्हणाली की, “पप्पा, मी आता कसं जगू शकेन.” माध्यमांतील वृत्तानुसार, सिद्धार्थ शुक्लाने शहनाज गिलच्या मिठीमध्ये अखेरचा श्वास घेतला होता. या सर्व घटनेमुळे शहनाजला खूप मोठा धक्का बसला आहे आणि ती हे सहन करू शकत नाही. शहनाजची प्रकृती सध्या वाईट आहे. याच दरम्यान, ‘बिग बॉस १३’ मधील सिद्धार्थचा मित्र असलेल्या अबू मलिकने आता सिद्धार्थच्या मृत्यूनंतर खुलासा केला आहे की, “शहनाज गिलला सिद्धार्थशी लग्न करायचे होते.” (The journey of ‘Sidnaz’ remained incomplete, promising to live with seven births)

एका माध्यामाला दिलेल्या मुलाखतीत अबू मलिक म्हणाला की, “एकदा शहनाजने त्याला सिद्धार्थला सांगायला सांगितले होते की, आपण दोघांनी लग्न करावे. एवढेच नाही तर एकदा सिद्धार्थनेही अबूला सांगितले की, त्याला शहनाज खूप आवडते.” सिद्धार्थच्या या आकस्मित मृत्यूनंतर शहनाजबद्दल खूप चिंता व्यक्त केली जात आहे.

अभिनेता सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज यांची मैत्री बिग बॉस १३ मध्ये जास्त फुलून आली. या शोमध्ये सर्वांना या दोघांची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळाली. या दोघांच्या केमिस्ट्रीमुळेच ही जोडी सुपरहिट झाली. यांनी त्यांच्या नात्याला कोणतेही नाव दिले नव्हते. पण हे दोघे नेहमी एकमेकांसोबत असायचे. त्यांच्या याच केमिस्ट्रीमुळे चाहत्यांनी त्यांना ‘सिडनाझ’ असे नाव दिले होते. तेव्हा पासून ही जोडी ‘सिडनाझ’ याच नावाने ओळखली जाऊ लागली.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सिद्धार्थच्या निधनाने एक्स गर्लफ्रेंड शेफाली भावुक; म्हणाली, ‘विश्वास ठेवणे खूपच कठीण’

-सिद्धार्थ शुक्लाप्रमाणेच ‘या’ लोकप्रिय कलाकारांनी देखील घेतला कमी वयात याजगाचा निरोप, जाणून घ्या त्यांची नावे

-‘बिग बाॅस’ फेम सिद्धार्थ शुक्लाची काय होती शेवटची सोशल मीडिया पोस्ट?

हे देखील वाचा