अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर त्याचे चाहते आणि सर्व हितचिंतक अजूनही धक्क्यात आहेत. ‘बिग बॉस १२’चा भाग असलेली गायिका जसलीन मथारूबद्दल एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सिद्धार्थच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी जसलीन मथारूची तब्येत खूप खालावली आहे आणि ती अजूनही रुग्णालयात दाखल आहे.
जसलीन झाली होती ट्रोलिंगची शिकार
जसलीन मथारूने इंस्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यात तिने सांगितले आहे की, सिडच्या निधनानंतर ती अभिनेत्याच्या घरी गेली आणि त्याच्या कुटुंबाची आणि शहनाझ गिलची अवस्था पाहिली. जसलीन मथारूने सांगितले आहे की, तिथून परत आल्यानंतर तिला खूप ट्रोल केले गेले. त्यानंतर तिची तब्येत खूपच खराब झाली आहे.
नेटकरी म्हणाले, ‘तू पण मरून जा‘
जसलीन तिच्या व्हिडिओमध्ये म्हणाली, “ज्या दिवशी सिद्धार्थ शुक्लाचे निधन झाले आणि मी त्याच्या घरी गेले. ती बातमी ऐकून आणि त्यांच्या घरात वेगळ्या प्रकारचं वातावरण झालं होतं. शहनाझ गिल आणि आँटीला भेटल्यानंतर मी माझ्या घरी आले. त्यानंतर मी मेसेज वाचला होता की, ‘तू पण मरून जा.’ अशा पद्धतीचे मेसेज मला मिळाले.”
https://www.instagram.com/tv/CTd9rHmoTMc/?utm_source=ig_web_copy_link
रुग्णालयात करावे लागले दाखल
जसलीन मथारू व्हिडिओमध्ये म्हणाली की, “मला माहित नाही की, आयुष्यात पहिल्यांदाच मला इतका मोठा फरक पडला आहे. मला वाटले की, आयुष्य इतके अप्रत्याशित आहे. सगळंच किती विचित्र आहे. मला माहित नाही काय झाले. त्यानंतर मला स्वतः रुग्णालयात दाखल व्हावे लागले.”
ताप होता १०४, पण तब्येत सुधारत आहे
जसलीन मथारू म्हणाली की, काल रात्री मला १०४ एवढा ताप आला होता आणि तरीही मी बरी होत आहे. स्वतःची काळजी घ्या आणि प्रार्थना करा की, मी सुद्धा लवकर बरी होईन.”
सिद्धार्थच्या मृत्यूनंतर त्या सर्व कलाकारांना सोशल मीडियावर ट्रोल केले गेले. ज्यांच्यासोबत सिद्धार्थ वादात सापडला होता.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-हाय गर्मी! अमृता खानविलकरच्या हॉट फोटोंनी वाढवला सोशल मीडियाचा पारा, एकदा पाहाच
-जबरदस्त! ऋतिकचे बायसेप्स पाहून चाहते तर सोडाच कलाकारही झाले हँग; टायगरने केली ‘अशी’ कमेंट
-राडाच ना! ‘या’ सेलिब्रेटींचे बाईक कलेक्शन पाहून तुमचेही डोळे होतील पांढरे










