सौरभ त्यागी दिग्दर्शित ‘क्या मेरी सोनम गुप्ता बेवफा है’ हा चित्रपट १० सप्टेंबरला ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. प्रदर्शित होण्यापूर्वीच बिहारमध्ये या चित्रपटाबाबत गोंधळ उडाला आहे. बिहारमध्ये हा चित्रपट प्रदर्शित न करण्यासाठी कैमूर जिल्ह्यातून विरोध सुरू झाला आहे. एवढेच नाही, तर संपूर्ण वैश्य समाजातील लोक या चित्रपटाच्या दिग्दर्शकावर कारवाई करण्याची मागणी करत आहेत.
https://www.instagram.com/p/CTR4fMhMa2w/?utm_source=ig_web_copy_link
संपूर्ण वैश्य समाजाचे राज्य संघटन सचिव शिव म्हणाले की, “वैश्य समाज या चित्रपटावर खूप भडकलेला आहे. शिव यांच्यानुसार, या चित्रपटात बिहारच्या वैश्य जातीला लाजवेल अशा गोष्टी सांगितल्या जात आहे. ते म्हणाले की, “सोनम नावाच्या हजारो महिला आणि मुली घरात राहतात. जेव्हा ती रस्त्यावर येईल, तेव्हा अनेक लोक त्यांच्यावर कमेंट्स करतील.” त्याचबरोबर त्यांनी भारताच्या पंतप्रधानांना आणि बिहारच्या मुख्यमंत्र्यांना एका पत्राद्वारे याची माहिती दिली आहे. (kya meri sonam gupta bewafa hai creates ruckus in bihar even before the release of the film on ott platform)
‘सुशील कुमार मोदी असते तर हे घडले नसते’
शिव पुढे म्हणाले की, “केंद्रात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी एनडीएचे सरकार आहे. एनडीए सरकार वैश्य समाजाच्या नावानेच ओळखले जाते. जर सुशील कुमार मोदी तेथे असते तर असे घडले नसते. हा शब्द उपमुख्यमंत्री तारकिशोर प्रसाद यांच्या कानापर्यंत पोहोचला नाही.”
बिहारमध्ये या चित्रपटावर बंदी घातली नाही, तर विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांच्याकडे जाणार आहेत. ते म्हणाले की, “एनडीए सरकार केवळ वैश्य समाजामुळे चालत आहे. आपल्याकडे कोणतेही सरकार बनवण्याची किंवा तोडण्याची क्षमता आहे. जर आमच्या मुलीवर आणि बहिणीवर अत्याचार झाले, तर आम्ही ते सहन करणार नाही. भाजप आणि एनडीएचे समर्थन विसरले जाईल.” असा इशारा वैश्य समाजाने दिला आहे. आता याबाबत नक्की पुढे काय होईल? हे येत्या काळात दिसून येईल.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-ब्रेकिंग: दिग्गज अभिनेता अक्षय कुमारच्या आईने घेतला जगाचा निरोप, आज सकाळी झाले निधन
-‘हद्द झाली यार!’ सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूवर व्लॉग बनवणाऱ्या संभावना सेठवर भडकले नेटकरी
-तो किस्सा, जेव्हा ‘या’ कारणामुळे जान्हवी कपूरला चक्क गाडीच्या डिक्कीमध्ये लागले लपावे










