Sunday, March 1, 2026
Home बॉलीवूड ‘शो मस्ट गो ऑन’ निर्मात्यांच्या नुकसानाचा विचार करता, आईच्या निधनानंतर अक्षय पुन्हा शुटिंगवर परतणार

‘शो मस्ट गो ऑन’ निर्मात्यांच्या नुकसानाचा विचार करता, आईच्या निधनानंतर अक्षय पुन्हा शुटिंगवर परतणार

अभिनेता अक्षय कुमारसाठी सध्याचे दिवस हे त्याच्या आयुष्यातील सर्वात दुःखद दिवस आहेत. अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे दोन दिवसांपूर्वी म्हणजेच ८ सप्टेंबर रोजी निधन झाले. आईच्या प्रकृती अस्वस्थाबद्दल आणि आईला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती केल्याबद्दल समजल्यानंतर अक्षय त्याची शूटिंग सोडून लगेचच मुंबईत आला होता. पण दुर्दैवाने उपचारा दरम्यान त्याच्या आईचे निधन झाले.

मनोरंजनसृष्टीसाठी किंबहुना सर्वच क्षेत्रांसाठी एक इंग्लिशमध्ये असणारी म्हण लागू होते ती म्हणजे, ‘द शो मस्ट गो ऑन’ अगदी तसेच आपली व्यक्ती निघून गेली तरी आपले जीवन आणि काम चालूच राहते. आणि जर आपल्या कामावर इतर अनेक लोकांचे पोट अवलंबून असेल तर त्यांच्यासाठी तरी आपण आपले दुःख बाजूला सारून काम केले पाहिजे. असच विचार अभिनेता अक्षय कुमारने केला असल्याचे समजत आहे. सध्या माध्यमांमध्ये येणाऱ्या वृत्तानुसार, आईच्या निधनानंतर अक्षय कुमार त्याचे शूटिंग पुन्हा सुरु करण्याच्या विचारत आहे. त्यासाठी तो लवकरच यूकेला जाऊ शकतो.

अक्षय कुमार हा इंडस्ट्रीमधील सर्वात मेहनती अभिनेत्यांपैकी एक आहे. आता तो लंडनमध्ये दिग्दर्शक रणजीत तिवारी यांच्या थ्रिलर ‘सिंड्रेला’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता. मात्र आईसाठी तो शूटिंग अर्ध्यावर सोडून मुंबईत आला होता. मात्र आता अक्षय लवकरच पुन्हा लंडनला जाणार असल्याचे समजत आहे. कारण जितके दिवस शूटिंग थांबेल तितके दिवस निर्मात्यांचे आणि चित्रपटाशी संबंधित असणाऱ्या सर्वांचे नुकसान होईल. असा चहुबाजुंनी विचार करून त्याने कोणालाही नुकसान होऊ नये यासाठी शुटिंगवर परतण्याचा निर्णय घेतला आहे. अक्षय या सिनेमाव्यतिरिक्त वाशु भगनानीच्या आगामी चित्रपटामध्ये ही दिसणार आहे.

दिग्दर्शक रणजीत तिवारीच्या चित्रपटाबद्दल सांगितले की, “मला नेहमी सायको-थ्रिलरमध्ये काम करायचे होते. आता मी तसेच सिनेमा करत असून, मी ‘सिंड्रेला’ या चित्रपटासाठी शूट करत आहे. तर आधी ‘मिशन सिंड्रेला’ चित्रपटाच्या नावाची चर्चा होत होती. पण अक्षयने सांगितलेल्या नावानंतर ‘सिंड्रेला’ हे नाव पक्के झाल्याचे मानले जात आहे. त्याचबरोबर आता या चित्रपटाचे नाव एखाद्या परीकथेसारखे वाटत असले, तरी हा एक सायको-थ्रिलर चित्रपट असणार आहे. जो तमिळच्या हिट सायकोलॉजिकल थ्रिलर ‘रत्सासन’ चा हिंदी रिमेक आहे.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’च्या सेटवर एन्जॉय करताना दिसले ‘ही मॅन’; चहा पित म्हणाले, ‘चीयर्स!’

-‘मी विराट कोहलीच्या प्रेमात वेडी झाले होते’, म्हणत ऋतिक रोशनच्या ‘या’ अभिनेत्रीने केला खुलासा

-रवी तेजा ईडीच्या कार्यालयात हजर, मनी लॉन्ड्रिंगसह ‘या’ प्रकरणीही करण्यात आली चौकशी

हे देखील वाचा