Monday, June 23, 2025
Home बॉलीवूड ‘तुमची गाणी ऐकण्यापेक्षा विष खाऊन मरणे पसंत करेल’, म्हणणाऱ्या ट्रोलरला टोनी कक्करचे जबरदस्त प्रत्युत्तर

‘तुमची गाणी ऐकण्यापेक्षा विष खाऊन मरणे पसंत करेल’, म्हणणाऱ्या ट्रोलरला टोनी कक्करचे जबरदस्त प्रत्युत्तर

गायक टोनी कक्करचे अनेक गाणे हे सुपरहिट ठरले आहेत. टोनी हा गायकीसोबतच तो संगीतकारही आहे. त्याचबरोबर तो गाणे देखील लिहितो. परंतु टोनीला अनेकदा त्याच्या गायन शैलीसाठी ट्रोल केले जाते. असेच एका टीकाकाराने त्याच्यावर टीका केली होती. आता त्याने एका ट्रोलरला प्रत्युत्तर दिले आहे. खरं तर एका टीकाकाराने प्रतिक्रियेत टोनीला टोमणा मारला आहे.

शुक्रवारी (१० सप्टेंबर) एका टीकाकाराने टोनी कक्करला प्रतिक्रिया देत लिहिले की, “सर तुमची गाणी ऐकण्यापेक्षा मी विष खाऊन मरणे पसंत करेल.” टोनीने याला उत्तर देत लिहिले की, “तू मरू नकोस, फक्त माझे गाणे कधी ऐकू नकोस. तुझे जीवन अनमोल आहे. असे अनेक टोनी कक्कर येतील आणि जातील. मी आशा करतो की, माझे आयुष्य तुला लाभो.”

टोनीने आणखी एक ट्वीट केले आहे. त्यामध्ये त्याने लिहिले आहे की, “मी अनेक गाणे बनवतो. त्यामध्ये अनेक प्रेमगीतांचाही समावेश आहे. मात्र, तुम्ही लोक नेहमी फक्त नृत्य गाण्यांबद्दल बोलता. तुम्ही त्यांनाच मोठे करता. त्याबद्दल धन्यवाद, पण तुम्ही लोक समजून घ्या मला काय म्हणायचे आहे.”

टोनी कक्करला अनेकदा त्याच्या डान्स नंबर आणि रिमिक्स इकोसाठी ट्रोल केले जाते. याबद्दल तो अनेक प्रतिक्रिया देखील देतो. काही वेळापूर्वी त्याने लिहिले होते की, “काही तरी लोक म्हणतात. मला माहित आहे की, माझ्या संगीताने मला काय दिले आहे. माझे घर, माझ्या गाड्या, माझे स्टारबक्स, सर्वकाही, खेळण्यांशिवाय बालपण घालवला आहे.”

अलीकडेच, टोनीच्या ‘साथ क्या निभाओगे’ या गाण्याला संमिश्र प्रतिसाद मिळाला. याबद्दल बोलताना तो म्हणाला की, “असहमती देखील खूप महत्वाची आहे कारण परिपूर्णता हानिकारक आहे.”

टोनी कक्कर हा नेहा कक्करचा भाऊ आहे. त्याने अनेक म्युझिक अल्बम्सना आपला आवाज दिला आहे. त्याची गाणी नवीन पद्धतीची असतात. त्यामुळे अनेकवेळा श्रोते जुळवून घेत नाहीत.

मागील काही दिवसांपूर्वीच टोनी कक्करचे ‘कांटा लाग’हे गाणं प्रदर्शित झाले आहे. त्याचबरोबर टोनी व्यतिरिक्त, नेहा कक्कर आणि यो यो हनी सिंग देखील या गाण्यात दिसत आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जेव्हा शाहरुखने केली गणपतीची स्थापना; मुलगा अबरामच्या पूजा करण्यावर कट्टरपंथींनी साधला होता निशाना

-‘वर्षभर या एका सणाची मी आतुरतेने वाट पाहत असते’, म्हणत श्रेया बुगडेने दिल्या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा!

-श्वास रोखून धरा! रजनीकांत यांच्या ‘अन्नाथे’ चित्रपटाचा फर्स्ट लूक आला समोर; ‘या’ दिवशी होणार रिलीझ

हे देखील वाचा