Monday, February 2, 2026
Home बॉलीवूड आमिर खानच्या बॉडीगार्डचा पगार ऐकाल, तर मोठमोठ्या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांचा पगार नक्कीच विसराल

आमिर खानच्या बॉडीगार्डचा पगार ऐकाल, तर मोठमोठ्या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांचा पगार नक्कीच विसराल

कलाकार म्हटले की, त्यांच्या फॅन फॉलोविंग आलीच. कलाकार लहान असो, मोठा असो, जुना असो किंवा नवीन सर्वच कलाकरांना चाहत्यांचे एक वलय असतेच. कलाकार आहे म्हणजे ते खासगी आयुष्य जगणारच नाही, फॅन्समध्ये जाऊन त्यांच्याशी संवाद साधणारच नाही, असे अजिबात नाही. कलाकार देखील बऱ्याचदा फॅन्समध्ये जातात, सार्वजनिक ठिकाणी हजेरी लावतात, कार्यक्रमांना जातात. मात्र यासर्व ठिकाणी जाताना कलाकार आपल्यासारखे मुक्तपणे कधीच फिरू शकत नाही. त्यांना सतत त्यांच्या बॉडीगार्डला सोबत घेऊनच बाहेर पडावे लागते. कलाकरांना सुरक्षित नेणारा आणि पुन्हा परत आणणारा हा बॉडीगार्ड कलाकारांसोबत अगदी सावलीसारखा असतो. 24 तास कलाकरांना सुरक्षा देणाऱ्या या बॉडीगार्डला कलाकार बक्कळ पगारही देतात. आता आपल्या बॉलिवूडच्या मिस्टर परफेक्शनिस्ट असणाऱ्या अमीर खानच्या बॉडीगार्ड्सचेच घ्या.

युवराज घोरपडे हा आमिर खानचा बॉडीगार्ड आहे. आमिर युवराजला वर्षाला दोन कोटी एवढा पगार देतो. मेडियामधील युवराजबद्दल असलेल्या माहितीनुसार त्याने वयाच्या 16 व्या वर्षीच शाळा सोडली आणि पोट भरण्यासाठी लहान मोठे काम करू लागला. नंतर त्याने एक सिक्युरिटी एजेन्सीमध्ये काम करायला सुरुवात केली. त्यानंतर हळूहळू तो कलाकारांना सुरक्षा द्यायला लागला. यातच त्याला आमिर खानच्या सुरक्षेची जबाबदारी मिळाली आणि तो आमिर खानचा बॉडीगार्ड बनला. युवराज चित्रपटांच्या प्रमोशनपासून ते शुटिंगपर्यंत सर्वच ठिकाणी आमिरसोबत दिसतो.

मीडिया रिपोर्टनुसार आमिर युवराजला बक्कळ पगार देतो. युवराजला आधी बॉडीबिल्डर बाण्याचे होते मात्र नंतर त्याने आमिरसोबत काम करायला सुरुवात केली आणि आज तो लाइमलाईट्मधे आहे. लवकरच शाळा सोडल्यामुळे त्याला खूप समस्यांना तोंड द्यावे लागले. मात्र आज त्याला पाहून त्याच्या मित्रांना त्याचा हेवा वाटतो.

आमिरसोबतच सलमान, शाहरुख, अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, दीपिका पदुकोण, अनुष्का शर्मा आदी अनेक कलाकार त्यांच्या बॉडीगार्ड्सला त्यांच्या सुरक्षेसाठी करोडो रुपये देतात.(aamir khan bodyguard yuvraj ghorpade salary)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
क्रिकेटर्ससोबत लग्न केल्यानंतर ‘या’ अभिनेत्रींनी ठोकला अभिनयाला रामराम

दिग्गजांविरुद्ध मिटू कॅम्पेनमध्ये उतरणाऱ्या अभिनेत्रीच्या जीवाला धोका, इंस्टाग्राम पोस्ट करून उडवली खळबळ

हे देखील वाचा