अभिनेता सिध्दार्थ मल्होत्रा सध्या त्याच्या आगामी द वन फोर्स ऑफ द फॉरेस्ट या चित्रपटामुळे चर्चेत आहे, ज्यामध्ये तमन्ना भाटिया मुख्य भुमिकेत असणार आहे. आणि द वन टीझर प्रदर्शित झाला असुन तो सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या चित्रपटाच्या टिझर मध्ये असे दिसुन येते की, ज्यामध्ये सिध्दार्थ आणि तमन्ना एका रहस्यमय कथेत रमलेले दिसत आहेत. हा चित्रपट बालाजी मोशन पिक्चर्स प्रस्तुत द वन हा आपल्याला लोककथा आणि कल्पनारम्यतेच्या अशा जगात घेउन जातो जी कथा मोठ्या पडद्यावर फारशी तुम्ही पाहली नसेल.
प्राचीन आणि अलौकिक शक्ती, प्राचीन श्रद्धा आणि रहस्ये हे चित्रपटाच्या कथेचे केंद्रबिंदू आहेत. दरम्यान, निर्मात्यांनी खुलासा केला आहे की ‘द वन’ हा चित्रपट बिहारमधील 16 व्या शतकातील ‘वन देवी’ मंदिरावर आधारित आहे. त्यामुळे ज्या प्रेक्षकांना भक्तीमय आणि इतिहासाबाबत ओळख करुन देणाऱ्या कथा आवडत असतील त्यानी हा चित्रपट जरुर पाहाव
‘द वन’चे दिग्दर्शन ‘पंचायत’ मालिकेचे दिग्दर्शक दीपक मिश्रा यांनी केले असून, टीव्हीएफचे अरुणभ कुमार आणि एकता कपूर यानी याची निर्मीती केली आहे. तसेच हा चित्रपट 25 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सिद्धार्थ आणि तमन्ना यांच्या व्यतिरिक्त सुनील (sunil)ग्रोव्हर, मनीष पॉल, अजय राजू आणि अनुप सोनी हे देखील या चित्रपटात असणार आहे.
हेही वाचा
हिप इंजरीनंतर रश्मिका मंदान्ना लवकरच करणार कामावर कमबॅक, म्हणाली हि गोष्ट मात्र मिस करेन









