मागील वर्षापासून संपूर्ण देशावर कोरोना व्हायरसचे संकट ओढवले आहे. या रोगामुळे अनेकांना आपला जीव गमावावा लागला आहे, तर काही जणांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहेत. अनेक लोकांच्या हातातील काम गेल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. संपूर्ण देशात आर्थिक संकट आले आहे. या सर्व परिस्थितीत अनेक लोकांनी आपल्यापरीने संकटात सापडलेल्या लोकांना मदत केली. परंतु या सर्व परिस्थितीमध्ये अभिनेता सोनू सूदने गरजू लोकांना सर्वोतोपरीने मदत केली. अनेक लोकांना पुनर्वसन करण्यासाठी आर्थिक मदत केली. कामासाठी घरापासून दूर असलेल्या लोकांना घरी सुखरूप पोहोचवले. अशा अनेक प्रकारे सोनूने लोकांना मदत केली.
परंतु याच लोकांच्या ‘देवदूता’वर एक संकट ओढवले आहे. सोनू सूदच्या घरावर आयकर विभागाने धाड टाकली आहे. सोनू सूदच्या घरी सुमारे २० तास आयकर विभागाकडून सर्वेक्षण करण्यात आले आहे. घर आणि कार्यालयासह ६ ठिकाणी आयकर पथकाने हे सर्वेक्षण केले आहे.
आयकर विभागाने बुधवारी (१५ सप्टेंबर) सोनू सूदच्या मुंबईतील कार्यालये आणि घरांचे सर्वेक्षण केले आहे. अधिकृत सूत्रांनी ही माहिती दिली आहे. आयटी अधिकाऱ्यांच्या टीमने सकाळपासून कारवाई सुरू केली होती. परंतु या कारवाई मागील कारण अजूनही कळू शकले नाही.
विशेष म्हणजे, कोव्हिड साथीच्या काळात सोनू सूदने लोकांना खूप मदत केली. यामुळे प्रसारमाध्यमे आणि सामान्य लोकांनी त्याचे खूप कौतुक केले आहे. कोरोना महामारी दरम्यान, सोनू सूदने मोठ्या संख्येने स्थलांतरित मजुरांना आर्थिक मदत केली होती. अशा मजुरांच्या प्रवासाची सोय करण्यासाठी त्यांनी जेवण, वाहने इत्यादींची व्यवस्था केली होती.
सच्चाई के रास्ते पर लाखों मुश्किलें आती हैं, लेकिन जीत हमेशा सच्चाई की ही होती है। @SonuSood जी के साथ भारत के उन लाखों परिवारों की दुआएं हैं जिन्हें मुश्किल घड़ी में सोनू जी का साथ मिला था। https://t.co/qsAyYvzkQP
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) September 15, 2021
सोनू सूद सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. मात्र, आयकर विभागाच्या या सर्वेक्षणाबद्दल त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेला नाही. त्याचबरोबर हे सर्वेक्षण अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील दिल्ली सरकारने सोनू सूदला शालेय विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनाच्या कार्यक्रमाचे ब्रँड एंबेसेडर म्हणून नियुक्त केल्यानंतर काही दिवसांनी करण्यात आला.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-निधन झाले गायिकेचे, पण सपना चौधरीलाच ठरवले मृत; अफवेने उडाली होती कुटुंबीयांची झोप
-ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे ट्विटर अकाऊंट कायमचे बंद, ‘ही’ आहे शेवटची पोस्ट
-अरबाजने अनिल यांना विचारला सलमानच्या लग्नाचा प्रश्न; अभिनेते म्हणाले, ‘तू तर त्याचा भाऊ आहेस…’










