Friday, March 20, 2026
Home बॉलीवूड ‘मला पुन्हा तिचे तोंडही नाही पाहायचे, तिने माझ्या…’, मौनी रॉयवर ‘या’ अभिनेत्याने लावले गंभीर आरोप

‘मला पुन्हा तिचे तोंडही नाही पाहायचे, तिने माझ्या…’, मौनी रॉयवर ‘या’ अभिनेत्याने लावले गंभीर आरोप

मैत्रीचे धडे देणारे आणि आदर्श असणारे या दुनियेत अनेक मित्र सापडतील. परंतु या मैत्रीमध्ये कधी फूट पडेल याचा काहीच अंदाज लावता येत नाही. काही व्यक्ती आपल्या सोईनुसार मैत्री करत असतात. गरज संपली की, त्यांची मैत्री देखील संपते. असाच काहीसा प्रकार अभिनेत्री मौनी रॉयबरोबर देखील घडला आहे.

मौनीने तिच्या अभिनयाने यशाचे शिखर गाठले आहे. ‘नागिन’ या मालिकेमधून ती घराघरात पोहोचली. तिने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर आज बॉलिवूडचा रस्ता देखील गाठला आहे. परंतु आजही तिचा गायक-अभिनेता अमित टंडनला खूप राग येतो. त्याने आपली पत्नी रुबी टंडनचा मौनीने फायदा घेतला असल्याचे म्हटले आहे. (This actor never wants to see Mouni Roy’s face, accused of taking advantage of Naagin fame)

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने मौनीविषयी त्याच्या मनामध्ये असलेला राग व्यक्त केला. मुलाखतीमध्ये त्याला त्याची पत्नी आणि मौनीमधील मैत्री संबंधांविषयी विचारण्यात आले होते. यावर तो म्हणाला की, “कोण मौनी? मला माहिती आहे माझी पत्नी असं काही बोलणार नाही, पण या मौनीने तिच्याबरोबर खूप वाईट केले आहे.”

मुलाखतीमध्ये पुढे तो म्हणाला की, “मला नाही वाटत मी पुन्हा कधी तिचे तोंड पाहू शकेल. तिने माझ्या पत्नीचा नेहमी वापर करून घेतला आहे. आम्हाला वाटत होते मौनी चांगली आहे, पण जेव्हा रुबी अडचणींमध्ये होती, तेव्हा मौनीने तिची साथ सोडून दिली. जसे लोक आपला चेहरा बदलतात, अगदी तशाच पद्धतीने मौनीचा खरा चेहरा आमच्यासमोर आला आहे. ही ती मौनी नाही, जिला आम्ही ओळखत होतो.”

एवढे बोलून अमित थांबला नाही. त्याने तिच्यावर अनेक आरोप देखील केले. तो म्हणाला की, “मी तिला एक चांगल्या मनाची समजत होतो, पण ती खूप स्वार्थी निघाली. तिने माझ्या पत्नीचे मन दुखावले. रुबी मोठ्या मनाची आहे त्यामुळे एक वेळ ती मौनीला माफ करेल, पण मी कधीच करणार नाही आणि माझ्या पत्नीला देखील असे करून देणार नाही. मी रुबीला सांगितले आहे जर तू तिला माफ केले, तर मी तुला तुझ्या आजूबाजूलाही दिसणार नाही.”

या कारणामुळे रुबीवर आले होते मोठे संकट
रुबीवर दुबई हेल्थ ऍथॉरिटीने सरकारी अधिकाऱ्यांना धमकवण्याचे आणि गैरव्यवहार करण्याचे आरोप केले होते. त्यासाठी तिला तुरुंगवास भोगावा लागला होता. यावेळी तिने तिच्या सर्व मित्रांकडे मदत मागितली. परंतु कोणीही तिच्या मदतीला धावून आले नाही. रुबी ही अमितची पत्नी असून ती एक त्वचाशास्त्रज्ञ देखील आहे. मौनी कायमच तिच्याकडे आपल्या त्वचेशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी जात होती. अशात या दोघींमध्ये पक्की मैत्री देखील झाली. या दोघींच्या मैत्रीमुळेच अमित देखील मौनीला ओळखू लागला होता. रुबीकडे अभिनय क्षेत्रातील मौनी रॉय, संजीदा शेख, विक्रम भट्ट असे अनेक कलाकार उपचारासाठी येत होते. अशात रुबीवर ओढावलेल्या प्रसंगानंतर ती जेव्हा मुंबईमध्ये परतली, तेव्हा मौनीने तिच्यापासून लांब राहणे स्वीकारले. या दोघींमधील मैत्री एवढी घट्ट होती की, कुणालाही वाटत नव्हते यांची मैत्री कधी तुटू शकेल.

या मालकांमध्ये झळकला आहे अमित
अमितने ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’, ‘दिल दे के देखो’, ‘ये है मोहब्बतें’, ‘अदालत 2’, ‘कैसा ये प्यार है’, ‘जरा नच के दिखा’ अशा अनेक मालिकांमध्ये अभिनय केला आहे. तो उत्तम अभिनयासह उत्तम गायन करतो. ‘इंडियन आइडल’च्या पहिल्या पर्वात त्याने स्पर्धक म्हणून सहभाग घेतला होता.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-उर्मिला मातोंडकरने सांगितला गणेश उत्सवाचा अनुभव; म्हणाली, ‘आम्ही कोकणातील आमच्या घरी…’

-‘लय भारी’ तेजस्विनीच्या मराठमोळ्या सौंदर्याची सर्वांनाच भुरळ, पदरावरील ‘त्या’ श्लोकाने वेधले खास लक्ष

-‘दिसला गं बाई दिसला’, म्हणणाऱ्या ‘राजा राणीची गं जोडी’ फेम संजूचा गावरान अवतार भावला नेटकऱ्यांना

हे देखील वाचा